वाहनांच्या नंबरप्लेट प्रकरणात भंगार व्यापारी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 10 ऑगस्ट 2017

नागपूर - शहरात एकाच क्रमांकाची अनेक वाहने धावत असल्याची गंभीर बाब ‘सकाळ’ने उघडकीस आणल्यानंतर आरटीओ आणि पोलिस विभाग सतर्क झाला. शहरातील काही भंगार व्यापारी दुचाकी आणि अन्य वाहने विकत घेतात. मात्र, त्या वाहनांची वर्षभर कटाई न करता चोरीच्या वाहनांवर ते क्रमांक टाकून विक्री करतात. या कृत्याला पोलिस विभागही त्यांना ‘अर्थपूर्ण’ साथ देत असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. 

शहरात एकाच क्रमांकाच्या अनेक दुचाकी असल्याचा प्रकार ताराचंद चरडे (नरेंद्रनगर) यांनी पोलिस आयुक्‍तांना केलेल्या तक्रारीनंतर उघडकीस आला. वाहतूक पोलिस उपायुक्‍त परदेशी आणि आरटीओ अधिकारी शरद जिचकार यांनी गांभीर्याने दखल घेऊन आळा घालण्यासाठी विशेष पथके स्थापन केलीत. मात्र, कुंपणच शेत खात असल्याचा प्रकार समोर येत आहे.  १५ दिवसांपूर्वी सक्‍करदरा पोलिस ठाण्यातील पीएसआय मधुकर बोकडे यांनी संगनमत करून भंगार झालेल्या ४४ दुचाकी एकाच दलालाला विक्रीचा घाट घातला होता. मात्र, ‘सकाळ’ने पुढाकार घेत त्यांचा डाव हाणून पडला. मात्र, असाच प्रकार यापूर्वीही झाला होता, तर अन्य पोलिस ठाण्यातील भंगार वाहने दलालांना विक्री करण्यात येणार आहेत. त्या वाहनांचे प्रमाणपत्र पोलिस विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालय देते. दलाल ती वाहने वर्षभर कटाई न करता चोरीची वाहने कमी पैशात विकत घेतात. पोलिसांनी भंगार दुकानावर छापा मारल्यास त्यांना पोलिसांचे प्रमाणपत्र असलेल्या दुचाकी दाखवितात. यातून केवळ धूळफेक सुरू आहे.

वाहने विकताना सावधान!
तहसील, मोमिनपुरा, गड्‌डीगोदाम आणि नंदनवनमध्ये सेकंड हॅंड दुचाकी विकत घेणाऱ्यांची गर्दी असते. कमी पैशात दुचाकी घेऊन केवळ नंबरप्लेटचा वापर चोरीच्या दुचाकीसाठी करतात. त्यामुळे नव्या गाडीला जुनी नंबरप्लेट लावून ती दुचाकी शहरात विक्रीसाठी काढली जाते. त्यामुळे दुचाकी विकताना विक्रेत्यांनी सावधानी बाळगायला हवी. विक्री केलेल्या दुचाकींच्या तीन ते चार नंबरप्लेट बनवून वेगवेगळ्या वाहनांना लावण्यात येत असल्याची माहिती आहे.

Web Title: nagpur news vehicle number plate case Scrape trader