त्वचा, केसांसाठी अंकुरित गव्हाचे जेल

मंगेश गोमासे 
गुरुवार, 8 जून 2017

नागपूर - बदलत्या हवामानामुळे गेल्या काही वर्षांपासून केस आणि त्वचेच्या समस्येत बरीच वाढ होताना दिसून येत आहे. त्यावर उपाय म्हणून अनेक सौंदर्यप्रसाधने बाजारात उपलब्ध आहेत. मात्र, ही सौंदर्यप्रसाधने बरीच महागडी आणि त्यापैकी काही शरीरासाठी हानीकारकही असल्याचे दिसून येते. यावर उपाय म्हणूनच लेडी अमृतबाई डागा महाविद्यालयातील कॉस्मेटिक टेक्‍नॉलॉजी विभागातील डॉ. सोनल दाभेकर यांनी अंकुरित गव्हाचा वापर करून त्वचा, केस आणि नखाच निरोगी ठेवण्यासाठी ‘जेल’ तयार केले आहे. 

अंकुरित गव्हाचे अनेक फायदे आहेत. त्यात व्हिटॅमिन, मिनरल्स, फायबर, फोलेट आणि फॅटी ॲसिड अशी अनेक मूलद्रव्ये आढळून येतात. याचा शरीराला बराच फायदा होतो. यापैकीच ‘फॅटी ॲसिड’ या गुणामुळे केस, त्वचा आणि नखांना निरोगी ठेवता येणे शक्‍य होते. त्यामुळे डॉ. सोनल दाभेकर यांनी अंकुरित केलेल्या गव्हाचे पीठ तयार करून त्याला बाजारात सहजरीत्या उपलब्ध असलेल्या ‘राइस ब्रान व्हॅक्‍स’मध्ये कोट केला. शिवाय जेलमध्ये त्याला मिक्‍स करून ‘हर्बल जेल’ तयार केले. 

दरम्यान, या जेलची तपासणी करण्यासाठी त्यांनी विश्‍वेश्‍वरय्या राष्ट्रीय अभियांत्रिकी संस्थेत असलेल्या ‘स्कॅनिंग इलेक्‍ट्रॉन मायक्रोस्कोपी’मधून टेस्ट केले शिवाय महाविद्यालयातही मुलींच्या स्कीनवर टेस्ट केले. 

इतर जेलच्या तुलनेत डॉ. सोनल दाभेकर यांनी तयार केलेले ‘जेल’ लवकरच इफेक्‍ट करणार आहे. यामुळे त्वचा, केस अगदी मुलायम होताना आढळून आले. 

याच विषयावर त्यांनी विभागप्रमुख डॉ. जयश्री हजारे यांच्या मार्गदर्शनात शोधप्रबंधही सादर केला. आता केंद्राच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या फेलोशिपसाठीही त्यांनी अर्ज केला आहे. शोधप्रबंधातून साकारलेले उत्पादन केवळ त्यापुरतेच मर्यादित न ठेवता, ते उत्पादन बाजारात आणून नागरिकांना कमी किमतीत त्याचा फायदा मिळवून देण्याचा त्यांचा संकल्प आहे.  

बाजारात अनेक सौंदर्यप्रसाधने, हर्बल उत्पादनेही आहेत. मात्र, ती बरीच महागडी आहेत. त्यामुळे अंकुरित गव्हापासून तयार केलेले जेल हे केस, त्वचा आणि नख सुदृढ ठेवण्यासाठी परिणामकारक आहे. त्याचा फायदा निश्‍चितच सामान्यांना होईल.
- डॉ. सोनल दाभेकर, प्राध्यापिका, कॉस्मेटिक टेक्‍नॉलॉजी डिपार्टमेंट, एलएडी, सेमिनरी हिल्स

Web Title: nagpur news vidarbha

टॅग्स