विदर्भातील शेतकरी आंदोलन मागे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

नागपूर - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिल्याने उद्या, (ता. 12) होणारे विदर्भातील शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आल्याने या कर्जमाफीचा विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. 

नागपूर - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला राज्य सरकारने तत्त्वतः मान्यता दिल्याने उद्या, (ता. 12) होणारे विदर्भातील शेतकऱ्यांचे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश आल्याने या कर्जमाफीचा विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. 

राज्य सरकारच्या मंत्री गटाशी शेतकऱ्यांच्या सुकाणू समितीच्या सदस्यांनी चर्चा केल्यानंतर कर्जमाफीला तत्त्वतः मान्यता देण्यात आली. यानंतर राज्यात सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सुकाणू समितीच्या निर्णयानंतर विदर्भातील आंदोलन स्थगित केल्याची माहिती शेतकरी संघटनेचे नेते राम नेवले यांनी दिली. शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल सरकारला घ्यावी लागली. अल्पभूधारकांचे संपूर्ण कर्ज माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या 26 जुलैपर्यंत याबद्दलची कार्यवाही सरकारला वेळ देण्यात आला आहे. तोपर्यंत ही कार्यवाही पूर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नेवले यांनी दिला. 

शेतकरी आंदोलनाचा विजयोत्सव शेतकरी संघटनेतर्फे उद्या, (ता. 12) गिरीपेठ येथील कार्यालयात सकाळी 11 वाजता साजरा केला जाणार आहे. या वेळी फटाके फोडून विजयोत्सव साजरा केला जाईल, असेही नेवले यांनी सांगितले. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसने काढलेल्या संघर्ष यात्रेमुळे राज्य सरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला, अशी प्रतिक्रिया आमदार सुनील केदार यांनी व्यक्त केली. गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांची स्थिती चांगली नाही. त्यामुळे कर्जमाफी देण्यात यावी, या मागणीसाठी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसने राज्यात संघर्ष यात्रा काढली होती. या संघर्ष यात्रेला मिळालेल्या प्रतिसादामुळे राज्यसरकारला कर्जमाफीचा निर्णय घ्यावा लागला. कर्जमाफीनंतर राज्यसरकारने आता कृषिपंपाचे विजेचे बिल माफ करण्याची गरज आहे. राज्य सरकारने कर्जमाफी सोबत कृषिपंपाच्या विजेचे बिल माफ करण्याची गरज आहे. 

Web Title: nagpur news vidarbha farmer strike farmer