देहदान समितीच्या बैठकीला ‘खो’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 जून 2017

नागपूर - मेंदूमृत्यू झाल्यानंतर अवयवदानातून इतरांचे आयुष्य सुखी करता येते. मरणोत्तर देहदानातून विद्यार्थ्यांना मानवी शरीररचना शास्त्र विषयाचा सखोल अभ्यास करता येतो. यासाठी मृतदेहाची गरज असते. देहदानाची चळवळ गतिमान करण्यासाठी मेडिकलमध्ये देहदान समिती गठित केली. मात्र मेडिकलमधील देहदान समितीची गेल्या वर्षभरापासून बैठक झाली नसल्याची माहिती पुढे आली. मात्र, दोन वर्षांपासून मेडिकलमध्ये होणाऱ्या देहदानाचा टक्का वाढलेला आहे. 

मेडिकलमधील २०० विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रात्यक्षिकासाठी २० मृतदेहांची गरज असते. परंतु अतिशय अल्प देहदान होते. २०१४ पर्यंत दरवर्षी ७ ते १२ मृतदेहांचे दान व्हायचे. मात्र, २०१५ पासून देहदानाचा टक्का वाढला. गेल्या दशकापासून मेडिकल, मेयोसह इतरही वैद्यकीय महाविद्यालयांत विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक शिक्षणासाठी मृतदेह उपलब्ध करून देण्याचे काम देहदान समितीकडून होत आहे. सुरुवातीला देहदान होत नव्हते, परंतु काळ बदलला. देहदानाबाबत समाजात जागृती झाली. यामुळेच देहदानात वाढ होताना दिसत आहे. मेडिकलचे शरीररचनाशास्त्र विभागप्रमुख डॉ. मिलिंद फुलपाटील यांच्यासह डॉ. तारकेश्‍वर गोडघाटे व इतर डॉक्‍टरांनी रात्रीच्या वेळी विभागाचे कुलूप उघडून देहदान स्वीकारले आहे. यामुळेच देहदान वाढले असल्याचे सांगण्यात आले. 

२०११ सालचा विचार करता केवळ ७ मृतदेह देहदानातून मिळाले. दोनशे विद्यार्थ्यांना मानवी शरीराचा अभ्यास करण्यासाठी हे सात मृतदेह अपुरे आहेत. २०११ ते २०१४ या चार वर्षांत मेडिकललमध्ये ३५ जणांचे देहदान झाले. तर २०१५ आणि २०१६ या दोन वर्षांत ५६ जणांचे देहदान झाले. ही बाब समाधानकारक आहे. देहदान समितीची बैठक लवकरच घेण्यात येईल.
-डॉ. मिलिंद फुलपाटील, विभागप्रमुख, शरीररचनाशास्त्र विभाग, नागपूर.

Web Title: nagpur news vidarbha government medical college

टॅग्स