विदेश राज्यमंत्र्यांचा पत्रकार परिषदेतून काढता पाय

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 जून 2017

नागपूर - तीन वर्षांच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला नवी दिशा दिली. मुद्रा, उज्ज्वला यासारख्या सर्व सामान्यांसाठीच्या योजनांतून गरिबांचे नशीब बदलत असल्याचा दावा विदेश राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार परिषदेत केला. मात्र, गोमास बंदी, नोटाबंदी, अमित शहा यांचे वक्तव्य आदी प्रश्‍नांची थेट उत्तर न देता त्यांनी पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला.

सरकारच्या तीन वर्षांच्या कार्यकाळातील माहिती देण्यासाठी वेकोलिने आयोजित केलेल्या ‘सब का साथ सब का विकास’ कार्यक्रमासाठी ते नागपूरला आले होते.  अकबर यांनी नोटाबंदी गरिबांच्या हितासाठीच केल्याचे सांगितले. आज देश-विदेशांतील प्रतिनिधी याची माहिती जाणून घेण्यासाठी भारतात येत आहेत. नोटाबंदीने अतिरेकी चवताळले आहेत. भारताताने अतिरेकी विरोधी कारवाया अधिक तेज केल्यात. मात्र, राजकीय पक्ष याचे भांडवल करून राजकारण करत आहेत. ते समजूनच घ्यायला तयार नाहीत. नोटाबंदीनंतर एक कोटी नवे करदाते झालेत. अनेक कार्यात पारदर्शकता आली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष आमदार सुधाकर कोहळे, आमदार अनिल सोले, खासदार विकास महात्मे, जयप्रकाश गुप्ता, चंदन गोस्वामी उपस्थित होते.

नागपूर नव्हे, उन्नतनगर!
नागपूर हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर आहे. संघ मुख्यालयाचा उल्लेख न करता हे शहर पंतप्रधानांचेसुद्धा असल्याचे अकबर म्हणाले. ज्या झपाट्याने नागपूर विकसित होत आहे, ते बघता या शहराला आता उन्नतनगर असे नाव द्यावे, असे गमतीने एम. जे. एकबर म्हणाले.

आकडे नेटवर बघा
तीन वर्षांत मोठ्या प्रमाणात देशातील गरिबी दूर झाली आहे. गरिबी दूर करणे हेच भाजप सरकारचे मुख्य उद्दिष्ट आहे. यासंदर्भात आकडेवारी मागितली असता ती नेटवर बघा, असा सल्ला एम. जे. अकबर यांनी दिला. तुम्ही आकड्यात जाऊ नका, गरिबीचा ग्राफ खाली येतो आहे, असाही दावा केला. गोमांस बंदीची मागणी महात्मा गांधी यांनीच केली होती. त्यावर घटनेने बंदी घातली आहे. मात्र, हा विषय राज्याचा आहे. यावर बंदी घालायची किंवा नाही याचे अधिकार राज्याचे आहे, असेही अकबर यांनी सांगितले.

Web Title: nagpur news vidarbha M. J. Akbar