मनपा रुग्णालयांची रंगरंगोटी, डागडुजी करा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

नागपूर - महापालिकेच्या रुग्णालयांची दुरवस्था बघण्यासाठी उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी मंगळवारी अचानक भेट दिली. रुग्णालयांची दुरवस्था बघून त्यांनी अधिकारी व डॉक्‍टरांना धारेवर धरत स्वच्छतेसोबत रुग्णालयांची रंगरंगोटी, डागडुजी करण्याचे निर्देश दिले.

नागपूर - महापालिकेच्या रुग्णालयांची दुरवस्था बघण्यासाठी उपायुक्त रवींद्र देवतळे यांनी मंगळवारी अचानक भेट दिली. रुग्णालयांची दुरवस्था बघून त्यांनी अधिकारी व डॉक्‍टरांना धारेवर धरत स्वच्छतेसोबत रुग्णालयांची रंगरंगोटी, डागडुजी करण्याचे निर्देश दिले.

महिभरापूर्वी ‘सकाळ’ने १५ दिवस स्टिंग ऑपरेशन करून वृत्तमालिकेद्वारे महापालिकेच्या रुग्णालयांची दुर्दशा चव्हाट्यावर आणली. या वृत्तमालिकेद्वारे शहरवासींना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेचे पितळ उघडे पाडले. ‘सकाळ’च्या वृत्तमालिकेची दखल घेत आरोग्य सभापती, वैद्यकीय अधिकारी (मेडिसीन) डॉ. नरेंद्र बहिरवार यांनी काही रुग्णालये तसेच हेल्थ पोस्टची पाहणी केली. मात्र, रुग्णालयांच्या सुधारणेबाबत कुठलीही समाधानकारक स्थिती दिसत नसल्याने उपायुक्त रवींद्र देवतळे यांनीच येथील रोगनिदान केंद्र तसेच पाचपावली येथील सूतिकागृहाचा अचानक दौरा केला.

त्यांनी प्रयोगशाळा, ओपीडी, औषधालय, फिजिओथेरेपी सेंटर, एक्‍स-रे सेंटर, दंतचिकित्सा केंद्र, ईसीजी कक्ष तसेच टीबी नियंत्रण कक्ष व पंचकर्म विभागाचे निरीक्षण केले. येथे त्यांना काळवंडलेल्या भिंती, बंद पंखे आदी दुरवस्था दिसून आले. दवाखान्याला रंगरंगोटी करून खिडकीच्या काचा बसविण्याचे निर्देश त्यांनी दिले. त्यानंतर पाचपावली सूतिकागृहाची पाहणी केली. येथे त्यांना सोनोग्राफी मशीन रेडिओलॉजिस्ट नसल्याने बंद पडल्याचे दिसून आले. त्यांनी तत्काळ मशीन दुरुस्तीचे निर्देश दिले. या रुग्णालयातही तुटलेल्या खुर्च्या आदी भंगार दिसून  आले. ते हलविण्याचेही निर्देश दिले. या वेळी आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र बहिरवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय जोशी, डॉ. बकूल पांडे उपस्थित होते.

Web Title: nagpur news vidarbha news municipal hospital