गुरुवंदनेतून अध्यात्माचा मार्ग सुकर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 जुलै 2017

नागपूर - जीवनाला दिशा देण्याचे काम गुरू करीत असतो. त्याच्या सान्निध्यात नेहमीच आत्मज्ञानाची प्राप्ती होत असते. गुरुवंदनेतून अध्यात्माचा मार्ग सुकर होत असल्याचे प्रतिपादन श्रीस्वामी समर्थ महाराज संस्थानचे अध्यक्ष दिनकरराव कडू यांनी व्यक्त केले. 

नागपूर - जीवनाला दिशा देण्याचे काम गुरू करीत असतो. त्याच्या सान्निध्यात नेहमीच आत्मज्ञानाची प्राप्ती होत असते. गुरुवंदनेतून अध्यात्माचा मार्ग सुकर होत असल्याचे प्रतिपादन श्रीस्वामी समर्थ महाराज संस्थानचे अध्यक्ष दिनकरराव कडू यांनी व्यक्त केले. 

‘सकाळ’तर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध गुरुपीठांच्या माहितीचा समावेश असलेल्या ‘श्रीगुरुवंदना’ या विशेषांकाचे बेसा मार्गावरील ‘स्वामिधाम’ येथे प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. सकाळ माध्यम समूहातर्फे दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ‘श्रीगुरुवंदना’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येते. या माध्यमातून विदर्भातील शक्तिस्थळे आणि त्यातून मिळणारी प्रेरणा यासंदर्भातील भाविकांचे मनोगत आणि त्या शक्तिपीठांच्या माहितीचा समावेश असतो. या वेळी सकाळचे मुख्य व्यवस्थापक (जाहिरात) सुधीर तापस, वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) विजय वरफडे उपस्थित होते. या वेळी दिनकरराव कडू यांनी सकाळच्या विशेषांकाचे कौतुक करीत सामाजिक कार्यात अग्रणी असलेले दैनिक म्हणून विशेष उल्लेख केला. स्वामिधामप्रमाणेच गोरगरिबांची सेवा करण्यात ‘सकाळ’ अग्रेसर आहे. ‘सकाळ’ने प्रकाशनासाठी स्वामिधाम निवडल्याने या विशेषांकाला स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळेल, असेही ते म्हणाले. या वेळी स्वामीधामच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती त्यांनी दिली. सुधीर तापस यांनी विशेषांकामध्ये असलेल्या वैविध्यपूर्ण लेखांमधून गुरुचे महत्त्व आणि गुरुपीठांच्या माहितीचे विवेचन केले. प्रास्ताविक विजय वरफडे यांनी केले. कार्यक्रमात सकाळचे सहकारी तेजस काळमेघ, मनीष किर्तनिया, अमोल कोड्डे, संदीप भुसारी, श्रीकांत कुरुमभाटे, मनीष दंडारे, सागर बागल, रूपेश मेश्राम उपस्थित होते.

Web Title: nagpur news vidarbha news Spirituality sakal