विदर्भात वादळी पावसाचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 जून 2017

नागपूर - मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. नागपूर वेधशाळेने येत्या शनिवारपासून तीन दिवस संपूर्ण विदर्भात वादळी पावसाची  शक्‍यता वर्तविली आहे. 

अंदमान आणि केरळमध्ये लवकर दाखल झालेल्या मॉन्सूनचा वेग मंदावल्याने विदर्भातील आगमनही लांबणीवर पडले आहे. मॉन्सूनची सध्याची प्रगती लक्षात घेता विदर्भात यायला  आणखी चार-पाच दिवस लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत. मात्र, त्याअगोदर, मॉन्सूनपूर्व पाऊस विदर्भाला जोरदार दणका देण्याची शक्‍यता आहे. शनिवारपासून पुढील तीन दिवस अनेक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकटासह मुसळधारची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

Web Title: nagpur news vidarbha rain weather