अर्ध्या तासाच्या फेरीसाठी अडीच तास प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 मे 2018

सावनेर : सावनेर आगारातून रामटेकसाठी दर अर्ध्या तासाने बसफेऱ्या आहेत. मात्र, रामटेककडे जाणाऱ्या गाड्या चक्क अडीच तासापर्यंत न आल्यामुळे प्रवाशांना वाट पाहावी लागत असल्याचे चित्र सावनेर बसस्थानकावर निर्माण झाले आहे. विचारणा केली असता एसटी कर्मचारीदेखील प्रवाशांना चांगली वागणूक देत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासोबतच प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रवाशांना एसटी कर्मचाऱ्यामुळे त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत.

सावनेर : सावनेर आगारातून रामटेकसाठी दर अर्ध्या तासाने बसफेऱ्या आहेत. मात्र, रामटेककडे जाणाऱ्या गाड्या चक्क अडीच तासापर्यंत न आल्यामुळे प्रवाशांना वाट पाहावी लागत असल्याचे चित्र सावनेर बसस्थानकावर निर्माण झाले आहे. विचारणा केली असता एसटी कर्मचारीदेखील प्रवाशांना चांगली वागणूक देत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यासोबतच प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असून, प्रवाशांना एसटी कर्मचाऱ्यामुळे त्रास होऊ नये यासाठी प्रयत्न करावेत. यासोबतच नागपूर सावनेर रोडवर पोलिस लाइन टाकळी क्रीडासंकुल चौकात थांबा आवश्‍यक असून या संदर्भात जय शिवाजी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिनेश इंगोले, गजेंद्र कोमुजवार, रमेश वानखडे, पुरुषोत्तम काळे, मनीष घोडे, भगवान चांदेकर यांनी केली आहे.

Web Title: nagpur news, waiting for bus

टॅग्स