धरणे कोरडीच, पाण्याचे संकट कायम 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

नागपूर - पावसाने पंधरा दिवसांत केवळ दोनदा हजेरी लावून नागरिकांना पुन्हा निराश केले. केवळ हजेरी लावणाऱ्या पावसामुळे धरणांची स्थिती "जैसे थे' आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तोतलाडोह येथील पेंच नदीवरील धरणात केवळ 11 टक्के पाणीसाठा आहे. पेंच धरणाचे बफर धरण असलेल्या नवेगाव खैरीमध्येही पाण्यात वाढ झाली नाही. 

जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर शनिवारी सकाळी केलेल्या नोंदीनुसार नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह येथील पेंच धरणात 10.98 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला या धरणात 78.78 जलसाठा होता. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा या धरणातील पाण्यात 67 टक्‍क्‍यांनी घट झाली असून, काही महिन्यांमध्येच नागपूरकरांवर जलसंकट कोसळण्याची शक्‍यता बळावली आहे. या धरणाच्या बफर झोन असलेल्या नवेगाव खैरीतून शहराला थेट पाणीपुरवठा होतो. परंतु, यात केवळ 50 टक्के पाणीसाठा आहे. मात्र, यातून शहराला पाणी मिळणे हे पेंच धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. त्यामुळे शहरावर पाणीसंकट कायम आहे. कन्हान नदीतील पाण्याची धारही कमी झाली आहे. 

पाण्याची बचत करा 
मुबलक पाणीसाठ्यासाठी सलग तीन-चार दिवस जोरदार पावसाची गरज आहे. राज्यात इतर भागात चांगला पाऊस होत असताना नागपूरकडे मात्र पाठ फिरविल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता पाण्याची बचत करण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. 

Web Title: nagpur news warter dam