मार्चअखेरही सोनेगाव यंदा पाण्याने भरलेलाच! 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 मार्च 2018

नागपूर - उन्हाळा लागला की सोनेगाव तलाव कोरडा पडल्याचे छायाचित्र दरवर्षी वर्तमानपत्रात झळकायचे. याच तलवात उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुले क्रिकेट खेळतानाही सर्वांनीच बघितले आहे. मात्र, हे चित्र आता बदलले आहे. एप्रिल महिना येऊन ठेपला तरी या तलावात पाणी भरून आहे. यामुळे परिसरातील विहिरींच्या पाण्याचीही पातळी कायम आहे. 

सोनेगाव तलावाला नवे कुठले झरे लागले नाहीत किंवा बाहेरून पाण्याचा स्रोतही लाभला नाही. नगरसेवक संदीप जोशी यांनी मागील वर्षी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सोनेगाव तलवाच्या पुनर्जीवनाचा संकल्प सोडला होता. त्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात तलावाचे खोलीकरण करण्यात आले. साचलेली माती काढली. तलावाचे सौंदर्यीकरण करण्यासाठी या परिसरात दोन उद्यान आणि वॉकिंग ट्रॅकची निर्मिती केली. यासाठी राज्य शासनाने 18 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यामुळे परिसर आकर्षक झाला आहे आणि तलावात उन्हाळ्याच्या दिवसातही पाणी कायम आहे. सोनेगाव तलावाच्या बचावासाठी संदीप जोशी यांनी केलेल्या मेहनतीचे सोने झाले आहे. सोनेगाव तलावाच्या खोलीकरणाचे काम दरवर्षी केले जाईल. याकरिता परिसरातील नागरिकांना सहकार्य करून यात सहभागी होण्याचे आवाहन जोशी यांनी केले. पर्यावरण तसेच जलदिनी फलक घेऊन फोटो काढणाऱ्या व स्वतःला पर्यावरणप्रेमी म्हणाऱ्यांनी सोनेगावपासून बोध घ्यावा, अशी प्रतिक्रिया परिसरातील एका नागरिकाने व्यक्त केली. 

Web Title: nagpur news water sonegaon lake summer