सामंजस्य करारानंतरही वायफाय सेवा बंद

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 जून 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि रिलायन्स जिओ यांच्यात नि:शुल्क दूरसंचार सुविधा उपलब्ध करून देणारा सामंजस्य करार झाला आहे. करारानुसार फेब्रुवारी २०१७ पासून विद्यापीठ प्रशासकीय भवन परिसर व वसतिगृहांमध्ये वायफाय सुविधा मिळणार होती. मात्र, तीन महिन्यांचा अवधी लोटूनही जिओने सेवा सुरू न केल्याने कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी नाराजी व्यक्त केली.

कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे आणि रिलायन्स जिओचे उपाध्यक्ष बालासुब्रमण्यम अय्यर यांच्यामध्ये वायफाय सुविधा देण्याचा करार जानेवारीमध्ये झाला. करारामुळे विद्यापीठाच्या विद्यार्थी व शिक्षकांना शैक्षणिक कायार्साठी वाय-फाय सुविधा फेब्रुवारी महिन्यापासून पुरविली जाणार होती. याबरोबरच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनाही याचा लाभ होणार आहे. याअंतर्गत रिलायन्स जिओद्वारे शैक्षणिक उपयोगासाठी कायमस्वरूपी वाय-फाय सुविधा तसेच मोफत सीमकार्ड पुरविले जाणार आहेत. त्याचा लाभ सर्व विद्यापीठीय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांबरोबरच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. यामुळे आधीच डिजिटल युनिव्हर्सिटीच्या दिशेने गतिमान झालेल्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाला अधिकचे बळ प्राप्त होइल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र, कुठे माशी शिंकली हे कळायला मार्ग नाही. 

आता विचार करावा लागेल
तीन महिन्यांपासून जिओचे सेटअप लागल्यानंतरही सेवा बंद आहे. यासंदर्भात कुलगुरूंनी जिओसोबतच्या करारावर नाराजी व्यक्त केली आहे. तसेच लवकर सेवा सुरू न केल्यास करारासंदर्भात विचार करावा लागेल, अशी ताकिद दिली आहे.

Web Title: nagpur news wi-fi vidarbha