पतीने केला पत्नीचा निर्घृण खून 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 मे 2018

नागपूर - पत्नीचे एका युवकासोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय घेत पतीने चाकूने गळा चिरून पत्नीचा निर्घृण खून केला. ही थरारक घटना आज गुरूवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास पांढराबोडीत उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी पतीस पोलिसांनी अटक केली. रामदिनेश रामलक्ष्मण मिश्रा (४५,संजयनगर झोपडपट्टी, पांढराबोडी) असे आरोपी पतीचे नाव आहे. मंजुळा रामदिनेश मिश्रा (वय ३६) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदिनेश मिश्रा हा मूळचा मध्यप्रदेशातील रहिवासी आहे. तो कामाच्या शोधात पत्नी मंजुळासह नागपुरात आला. तो पांढराबोडी परिसरात किरायाने राहत होता. त्यांना १२ वर्षाची एक मुलगी आहे. सुरूवातीला त्याने एका हॉटेलमध्ये कूक म्हणून काम केले. त्यानंतर तो लग्न-समारंभात स्वयंपाक बनविण्याचे ठेके घेत होता. 

पत्नीही त्याला या कामात मदत करीत होती. अनेकदा रामदिनेश हा मजूर महिलांना घेऊन तीन ते चार दिवसांपर्यंत स्वयंपाकाच्या कामानिमित्त बाहेर राहत होता. मुलीसह एकटी घरी राहत असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर त्याला संशय होता. त्यावरून अनेकदा त्यांच्यात खटकेही उडाले होते. रामदिनेशकडे मजूर म्हणून कामाला असलेल्या एका युवकाशी मंजुळाचे अनैतिक संबंध असल्याची कुणकुण पतीला होती. याच कारणावरून गुरूवारी सायंकाळी त्यांच्यात वाद झाला. वाद विकोपाल गेल्यानंतर त्याने घरातील भाजी कापण्याच्या चाकूने पत्नीचा गळा चिरून खून केला.  त्यानंतर तो स्वतःच घरमालकाकडे येऊन खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर तो थेट अंबाझरी पोलिस ठाण्यात पोहचला. पोलिसांनी त्याला लगेच अटक केली. त्याच्या घरातून मंजुळाचा मृतदेह ताब्यात घेतला.

Web Title: nagpur news Wife murder