वन्यजीव अभ्यासक आले आमने-सामने

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

नागपूर - विदर्भात वाघांना पश्‍चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा प्रस्तावावर वन्यजीवप्रेमी आणि अभ्यासक आमने-सामने आले आहेत. वाघ सोडणे अव्यावहारिक असल्याचे सांगत काहींनी यास विरोध केला तर विदर्भात मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असल्याने ती काळाची गरज असल्याचे काहींचे म्हणणे आहे.   

नागपूर - विदर्भात वाघांना पश्‍चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडण्याचा प्रस्तावावर वन्यजीवप्रेमी आणि अभ्यासक आमने-सामने आले आहेत. वाघ सोडणे अव्यावहारिक असल्याचे सांगत काहींनी यास विरोध केला तर विदर्भात मानव-वन्यजीव संघर्ष वाढत असल्याने ती काळाची गरज असल्याचे काहींचे म्हणणे आहे.   

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाढत्या वाघांमुळे विदर्भात मानव व वन्यजीव संघर्ष वाढत  आहे. गेल्या काही दिवसांत ताडोबा व ब्रह्मपुरी भागात वाघांनी लोकांवर हल्ले केल्याच्या घटना वाढल्या, अशी माहिती मुनगंटीवार यांनी विधानसभेत दिली. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील वाघ सह्याद्रीच्या जंगलात सोडण्याचा विचार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले. यावर वन्यजीवतज्ज्ञांनी नाराजी व्यक्‍त करीत ‘वाघाला त्याच्या  अधिवासातून हलविण्याचे प्रयोग करू नयेत. त्यांच्या जगण्याच्या नैसर्गिक प्रक्रियेत हस्तक्षेप करणे चुकीचे आहे, असे वन्यजीवतज्ज्ञ व सातपुडा फाउंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे यांनी सांगितले.   

यावर रिठे म्हणाले, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या प्रमाणापेक्षा अधिक नाही.  वाघ वास्तव्याला असलेल्या जंगलाचा पोत, तृणभक्षी प्राण्यांची संख्या, वाघाच्या प्रजननासाठी आवश्‍यक वातावरणामुळे वाघांची संख्या वाढते. विदर्भातील सर्व जंगलांत वाघांची संख्या वाढत नाही. माणसांच्या लोकसंख्येवर वाघ जगू शकणार नाही. सह्याद्रीत वाघ सोडण्याचा निर्णय घेतल्यास तेथेही मानव व वन्यजीव संघर्ष अधिक तीव्र होईल, असा धोकाही रिठे यांनी व्यक्‍त केला. 

वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील म्हणाले, वाघ सोडणार आहेत तेथील जंगलाचा पोत कसा आहे, तेथे तृणभक्षी प्राण्यांची संख्या किती आहे, जलसाठ्यांची स्थिती काय आहे, या स्थितीचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यानंतरच वाघाला सोडणे योग्य ठरेल. जेरबंद केलेल्या वाघाला सह्याद्रीच नव्हे तर देशातील वाघ नसलेल्या परिसरात सोडावे, असे मत निसर्गप्रेमी विनीत अरोरा यांनी व्यक्त केले. 

Web Title: nagpur news Wildlife practitioner