परिचारिकांचे आयुष्य जोखमीचे 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

नागपूर - परिचर्या हा व्यवसाय नाही तर सेवाधर्माचे नाव आहे. या व्यवसायाला कारुण्याची किनार आहे. रोटी, कपडा, मकान या मूलभूत गरजांसोबत आरोग्यसेवा ही मोठी गरज आज बनली असून या आरोग्यसेवेचा कणा परिचारिका आहे. सेवेदरम्यान परिचारिकांना सुया व सर्जिकल साहित्य हाताळताना 20 प्रकारच्या दुखापती सहन कराव्या लागल्या असून यातून संक्रमित आजाराच्या विळख्यात सापडल्या आहेत. दर्जेदार आरोग्य सुविधा रुग्णांना उपलब्ध करून देण्यासाठी परिचारिकांची सुरक्षा आवश्‍यक आहे, असा सूर निष्कर्ष संशोधनातून पुढे आला आहे. 

जागतिक परिचारिकादिनाच्या पार्श्‍वभूमीवर नागपूर येथील अमेरिकन ऑन्कोलॉजी इन्स्टिट्यूट ऍण्ड नांगिया स्पेशालिटी हॉस्पिटल आणि बेक्‍टॉन डिकिन्सन इंडिया (बीडी) या संस्थेने देशातील 60 मल्टिस्पेशालिटी रुग्णालयांमध्ये हे सर्वेक्षण केले. यात देशभरातील रुग्णालयांशी निगडित आरोग्य क्षेत्रातील डॉक्‍टरसह पाच हजारांवर व्यावसायिकांचा अभ्यास करण्यात आला. यात प्रामुख्याने 400 परिचारिकांचा समावेश होता. 

अहवालातील निष्कर्ष 
परिचर्या व्यवसायातील परिचारिकांना "सुया' आणि "सर्जिकल' साहित्य हाताळताना 20 प्रकारच्या दुखापती झाल्या आहेत. यात रक्‍ताचे नमुने घेणे, नीडल रिकॅपिंग, इंजेक्‍शन लावणे, त्यांची विल्हेवाट, कचऱ्याची विल्हेवाट, लसीकरण अशा कामांमधून परिचारिकांना दुखापतीनंतर संसर्ग झाला आहे. 20 हून अधिक प्रकारच्या संक्रमित आजारांच्या जोखीम परिचारिका स्वीकारत आहेत. याशिवाय श्‍वसनविकार, स्वाइन फ्लू, क्षयरोगसारख्या संसर्गजन्य आजाराचा विळखा परिचारिकांना पडतो आहे. परिचारिका श्‍वासोच्छवासातून पसरणाऱ्या आजारांच्या जोखमीवर असल्याचेही आढळले. 

दर्जेदार आरोग्य सुविधा रुग्णांना मिळावी हा रुग्णांचा हक्क आहे. तर ही सेवा पुरविताना आजारी व्यक्तीची सेवा करणे हे रुग्णालयांचे ध्येय असते. यात परिचारिका महत्त्वाची भूमिका निभावत असतात. त्यामुळे परिचारिकांची सुरक्षा हेदेखील रुग्णालयाचे कर्तव्य आहे. परिचारिकांच्या आरोग्याची काळजी घेणे, दिशदर्शक तत्त्वांची काटेकोर अंमलबजावणी करणे हे रुग्णालयांचे काम आहे.  
मेरी स्वराज्यम तल्लापल्ली, मेट्रन 

शस्त्रक्रिया व वापरलेल्या सर्जिकल साहित्याची विल्हेवाट लावताना योग्य काळजी घेण्याचे प्रशिक्षण देण्याचे काम रुग्णालयाचे आहे. तर रक्ताचे नमुने गोळा करण्यासोबतच इंजेक्‍शन, इन्फ्यूजन थेरेपीची कामे परिचारिका प्रामुख्याने करतात. त्यामुळे निश्‍चितच त्यांना जोखीम असते. ही जोखीम पेलवण्यासाठी परिचारिका प्रशिक्षित असाव्यात. 
-पवन मोचेर्ला, व्यवस्थापकीय संचालक बीडी 

Web Title: nagpur news World nurse day story