गुलाल उधळून आनंद द्विगुणित

गुलाल उधळून आनंद द्विगुणित

नागपूर -  ‘डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या (यिन) ‘लीडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम’अंतर्गत दुसऱ्या टप्प्यात २३, २४ ऑगस्टला नागपूर जिल्हा आणि शहरातील आठ महाविद्यालयांत ‘यिन’ प्रतिनिधींसाठी निवडणुका पार पडल्या. यावेळी नेमके कोण निवडून येणार, याची उत्कंठा प्रत्येकच उमेदवाराला लागली असताना, शनिवारी (ता. २६) ‘सकाळ’च्या शहर कार्यालयात पार पडलेल्या मतमोजणीनंतर निकालाची घोषणा करण्यात आली. यावेळी निकालानंतर विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थक विद्यार्थ्यांनी गुलालाची उधळण करीत विजयी जल्लोष केला. प्रतिस्पर्धी उमेदवारांनी खिलाडूवृत्तीने विजयी उमेदवाराला शुभेच्छा देत, जल्लोषात सहभागी होऊन आनंदोत्सव साजरा केला.

महाविद्यालयीन तरुणाईतील बुद्धिमत्ता आणि सर्जनशीलतेला वाव देऊन त्यांच्यात नेतृत्वगुण तयार करणाऱ्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’च्या नेतृत्वविकास उपक्रमांतर्गत ‘यिन’ प्रतिनिधींची निवड करण्यासाठी गुरुवारी आणि शुक्रवारी शहर आणि जिल्ह्यातील महाविद्यालयांत ‘यिन’ निवडणुका पार पडल्या. यावेळी जिल्ह्यातील निवडणुकांना विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महाविद्यालयात असलेल्या मतदान केंद्रावर मतदानासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. बऱ्यांच महाविद्यालयांत विद्यार्थ्यांनी मतदानासाठी रांगा लावल्या होत्या. विशेष म्हणजे अनेकांनी दोन ते तीन दिवसांपासून महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधून प्रचारास सुरवात केली. शिस्तीसह शांतता आणि उत्साहपूर्वक वातावरणात मतदान पार पडले. यानंतर आठ महाविद्यालयांत ३३ उमेदवारांचे भाग्य मतपेटीत बंद झाले. मात्र, मतदानानंतर नेमका कुठला उमेदवार, कोणता उमेदवार त्यात बाजी मारेल याची उत्कंठा प्रत्येकच उमेदवाराला होती. 

शनिवारी सकाळी साडेदहाला मतमोजणीस सुरवात झाली. यादरम्यान प्रत्येकच महाविद्यालयातील उमेदवारांसमोर यिन प्रतिनिधीच्या मतदानाची मतपेटी उघडण्यात आली. साधारणतः पाच तास चाललेल्या मतमोजणीनंतर कार्यकारी संपादक शैलेश पांडे यांनी निकाल जाहीर केला. यावेळी सहयोगी संपादक प्रमोद काळबांडे, यिन जिल्हा समन्वयक सूरज इमले उपस्थित होते. 

विजेत्यांच्या नावांची घोषणा होताच, एकच जल्लोषास सुरवात झाली. अनेकांनी विजयी घोषणा देत, कार्यालय दणाणून सोडले. यानंतर कार्यालयासमोर गुलालाची उधळण करीत विजयाचा आनंद साजरा केला. अनेक पराभूत उमेदवारांनी विजयी उमेदवारांना मिठी मारीत खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन केले. मुलींनीही जल्लोष करीत आनंद साजरा केला. 

यावेळी विद्यार्थ्यांच्या आनंदात शिक्षकही सहभागी झाले होते. ‘सकाळ’ने विजयी उमेदवारांवर शुभेच्छा देत, ‘यिन’ चळवळ पुढे नेत समाजात बदल घडवून आणण्याचे आवाहन केले. मतमोजणीसाठी यिनच्या उपमुख्यमंत्री गझाला खान, विनोद हजारे, कुणाल घेर, नीलेश कोढे, संकेत दुरूगकर, रोशन कुंभलकर, प्रवीण मोरे, शुभम वाघमारे, युवराज हरणे, अवंती वाकेकर, शुभेच्छा तिडके, श्रुती राजूरकर, सोनिया वैद्य, समीक्षा रायदास, रक्षंदा झोडापे, समीक्षा राघोडे यांनी सहकार्य केले. 

निवडून आलेले अध्यक्ष
नीलेश साखरकर (धनवटे नॅशनल महाविद्यालय), गीता बावणे (नागपूर इन्स्टिटयूट ऑफ टेक्‍नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय), अश्विनी शेंडे (नवप्रतिभा महाविद्यालय), विवेक मानेकर (भिवगडे नॅशनल महाविद्यालय), रजनीगंधा उईके (श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालय, महाल), योगेश जालंदर (बॅरी. शेषराव वानखेडे महाविद्यालय, खापरखेडा), आशीष बारंगे (मातोश्री अंजनाबाई मुंदाफळे महाविद्यालय, नरखेड), शुभांगी नासरे (राणी लक्ष्मीबाई महिला महाविद्यालय, सावरगाव) 

निवडून आलेले उपाध्यक्ष
शादाब सोफी (धनवटे नॅशनल महाविद्यालय), नयना संतवाणी (नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी अभियांत्रिकी महाविद्यालय), निशा नेवारे (नवप्रतिभा महाविद्यालय), आकाश सोमवंशी (भिवगडे नॅशनल महाविद्यालय), निकिता कायरकर (श्रीमती बिंझाणी महिला महाविद्यालय, महाल) मोहन खाडे (बॅरी. शेषराव वानखेडे महाविद्यालय, खापरखेडा), स्वेता ठाकरे (मातोश्री अंजनाबाई मुंडाफळे महाविद्यालय, नरखेड), जयश्री कामडी (राणी लक्ष्मीबाई महिला महाविद्यालय, सावरगाव).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com