‘इन्स्पिरेटर्स’ व्हा, ‘इन्स्पिरेशन’ द्या - डॉ. कमलसिंग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 जून 2017

नागपूर - प्रत्येक व्यक्‍तीत काहीतरी करण्याची जिज्ञासा असते. तिला जागविण्यासाठी फक्त प्रेरणा हवी असते. युवकांनी स्वत: ‘इन्स्पिरेटर्स’ होऊन इतरांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जी. एच. रायसोनी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कमलसिंग यांनी केले.

नागपूर - प्रत्येक व्यक्‍तीत काहीतरी करण्याची जिज्ञासा असते. तिला जागविण्यासाठी फक्त प्रेरणा हवी असते. युवकांनी स्वत: ‘इन्स्पिरेटर्स’ होऊन इतरांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन जी. एच. रायसोनी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कमलसिंग यांनी केले.

स्पेक्‍ट्रम ॲकेडमी प्रस्तुत सकाळ ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’द्वारे आयोजित नीलया ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन द्वारा समर्थित ‘सीड इन्फोटेक’ आणि ‘सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ यांच्या सहकार्याने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने व जी. एच. रायसोनी विद्यापीठाच्या सहाकार्याने घेतलेल्या ‘समर युथ समिट २०१७’च्या उद्‌घाटनप्रसंगी गुरुनानक सभागृहात त्या गुरुवारी बोलत होत्या. 

अध्यक्षस्थानी ‘यिन’चे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. केशव वाळके, ‘सकाळ’च्या विदर्भ आवृत्तीचे कार्यकारी संपादक शैलेश पांडे, सीड इन्फोटेकचे चंदन धारा, स्पेक्‍ट्रमच्या रिंकू जैस्वाल, ‘यिन’ची उपमुख्यमंत्री गझाला खान उपस्थित होते.

डॉ. कमलसिंग म्हणाल्या, जेव्हा एखादा व्यक्ती विचार करतो, त्यामागे कुणाची तरी प्रेरणा असते. ती प्रेरणा मिळविण्यासाठी शरीर, मन आणि मस्तिष्क जागेवर ठेवावे लागते. त्यानंतर प्रेरणादायी विचार कार्यवर्तित करण्यासाठी स्वत:मधील शक्ती ओळखून ती जागृत करायची असते. तुम्हा स्वत:मधील ती शक्‍ती ओळखा. स्वत:ला जागृत करा आणि त्यातून देश घडविण्याचा प्रयत्न करा. यश गाठण्यासाठी स्वत:ला झोकून द्या. त्यातून जे काही वेगळे निर्माण होईल, ते तुमच्या आणि इतरांना प्रेरणादायी ठरेल. केवळ विचार ऐकले आणि प्रेरणा मिळाली असे होत नसून त्या विचाराची शेवटपर्यंत अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. शिवाय जे काम दररोज करतो, त्यापैकी कोणता वेळ आपल्या प्रगतीच्या कामात दिला याचे ऑडिट करा, असेही त्या म्हणाल्या. यावेळी तेजस गुजराथी आणि डॉ. केशव वाळके यांनीही विचार व्यक्त केले. प्रास्ताविक कार्यकारी संपादक शैलेश पांडे यांनी केले. संचालन आश्‍लेषा कावळे यांनी केले. आभार ‘यिन’चे पालकमंत्री नीलेश खोडे यांनी मानले.

विद्यार्थ्यांचा उत्साह 
‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ आयोजित ‘समर युथ समिट २०१७’मध्ये सहभागी होण्यासाठी सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. यावेळी ‘युथ समिट’मध्ये गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि नागपूर जिल्ह्यांतील विद्यार्थी सहभागी झाले आहेत.

‘फाइव्ह एस’वर लक्ष केंद्रित करा
आयुष्यात यशस्वी व्हायचे असल्यास ‘फाइव्ह एस’वर अंमलबजावणी करण्याचे आवाहन डॉ. कमलसिंग यांनी केले. यात सेल्फ स्टडी, सेल्फ डिटरमिनेशन, सेल्फ डिसिप्लीन, सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ ॲनालिसीसचा समावेश आहे. या पाच गोष्टींची अंमलबजावणी केल्यास स्वत: आणि देशाची प्रगती साधता येईल, असा सल्ला त्यांनी युवकांना दिला.

शिबिरात आज
 १०.३० वा. : सहायक संचालक प्रशांत वावगे यांचे ‘ध्येयनिश्‍चिती आणि प्राप्ती’ विषयावर व्याख्यान.
 ११.३० वा. : स्पेक्‍ट्रम ॲकेडमीचे संस्थापक सुनील पाटील यांचा तरुणाईशी संवाद.
१ वा. : मनी बी इन्स्टिट्यूटच्या संचालिका शिवानी दाणी यांचे ‘ऑनलाइन बॅंकिंग, व्यवहार आणि 
 गुंतवणूक’ यावर मार्गदर्शन.
३ वा. : विदर्भ युथ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत कडू यांचे ‘सेल्फ ब्रॅंडिंग’वर व्याख्यान. 
४ वा. : नगरसेवक संदीप जोशी यांचे ‘राजकारण आणि नागरिकांचा सहभाग’ विषयावर मार्गदर्शन. 
५ वा. : महापालिका आयुक्त अश्‍विन मुद्‌गल यांचा तरुणाईशी संवाद.

Web Title: nagpur news yin summer youth summit