काळ्या यादीतील कंपनीला कंत्राट 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017

नागपूर - जिल्हा परिषदेच्या स्थायी समिती बैठकीत विद्युतीकरणाच्या कंत्राटाचा मुद्दा गाजला. बांधकाम विभागाअंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुख्य इमारत व निवासस्थानाच्या विद्युतीकरणाचे कंत्राट काळ्या यादीत टाकलेल्या कंपनीला देण्यात आल्याचा आरोप दिल्याचा आरोप मनोहर कुंभारे व नाना कंभाले यांनी पत्रकरांशी बोलताना केला. 

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने जिल्हा परिषदेच्या तीन प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारत व निवासस्थानाचे विद्युतीकरणाचे काम विदिशा इलेक्‍ट्रीकल कंपनीला देण्यात येण्यासंदर्भातील प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आले होता. यात प्राथमिक आरोग्य केंद्र, भूगाव मेंढा येथील 31 लाख 51,241 रुपये, प्राथमिक आरोग्य केंद्र, सालईगोधनी येथील 36 लाख 85,472 रुपये व प्राथमिक आरोग्य केंद्र धानला येथील 32,98358 रुपयांचे काम आहे. विदिशा कंपनी जिल्हा परिषदेने ब्लॅक लिस्टेड केली आहे. त्यामुळे या कंपनीला काम न देण्याचा मुद्दा नाना कंभाले व मनोहर कुंभारे यांनी केली. मात्र, त्यानंतरही त्यांना काम देण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला. यात आर्थिक तडजोड झाल्याचा आरोपही त्यांनी लावला.

Web Title: nagpur news zp Contract

टॅग्स