इंदूरकरांची पदोन्नती नियमबाह्य!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 15 जानेवारी 2018

नागपूर - जिल्हा परिषदेचे कर्मचारी किशोर इंदूरकर यांना दिलेली पदोन्नती नियमबाह्य असल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने दिल्याचे समजते. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. कादंबरी बलकवडे इंदूरकर यांना पदोन्नती देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे तत्कालीन अभियंता डी. डी. सावरकर यांनी ग्रामीण पाणीपुरवठा उपविभागाचे विद्युत पर्यवेक्षक किशोर इंदूरकर यांना शैक्षणिक योग्यता नसताना पदोन्नती देत अभियंत्याचे काम दिले. यामुळे कामाच्या गुणवत्तेवर परिणाम झाला असून, १९९९ ते २००३ या काळात ८१ लाखांची बोगस कामे झाल्याचे लेखापरिक्षणात समोर आले. 

विभागीय आयुक्त कार्यालयाच्या आदेशावरून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बलकवडे यांनी समान्य प्रशासनाच्या विभागप्रमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखळेकर यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांनी समिती नियुक्ती केली. यात पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता टाकळीकर यांचाही समावेश आहे. मात्र, त्यांच्या विभागाकडून कागदपत्र देण्यास टाळाटाळ झाल्याने चौकशीस विलंब होत असल्याचे लेखी स्पष्टीकरण जाखळेकर यांनी सीईओ डॉ. बलकवडेंना दिले होते. समितीने इंदूरकरांच्या पदोन्नती संदर्भात अहवाल दिला आहे. यात इंदूरकर यांना दिलेली पदोन्नती नियमबाह्य असल्याचा निष्कर्ष देण्यात आला आहे.

Web Title: nagpur news zp employee kishor indurkar