जि.प. सदस्य भुते अडचणीत 50 हजाराची लाच दिल्याचा आरोप 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

नागपूर - जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण निंबाळकर यांनी ग्रामसेविकेला लाचेतील निम्मी रक्कम जिल्हा परिषदेचे सदस्य उपासराव भुते यांना देण्यास सांगितली होती. त्यानुसार आपण भुते यांना 50 हजार रुपयांची रोख रक्कम दिल्याचा आरोप या ग्रामसेविकेने दिलेल्या लेखी तक्रारीत केला आहे. त्यामुळे भुतेही अडचणीत येण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. 

शनिवारी एसीबीने त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी इंगळे यांच्या समक्ष हजर केले. भुते यांना 50 हजार रुपये दिल्याचा आरोप ग्रामसेविकेने केला आहे. निंबाळकर यांनी फोनवर या ग्रामसेविकेला 25 हजार रुपयेच मिळाल्याचे सांगितले. हे संभाषण एसीबीतर्फे रेकॉर्ड करण्यात आले आहे. तसेच भुते यांचे बयान नोंदवायचे आहे आणि या प्रकरणाचा सखोल तपास करायचा असल्याने भुते यांना पोलिस कोठडी सुनावण्यात यावी, असा युक्तिवाद जिल्हा सरकारी वकील नितीन तेलगोटे यांनी केला. त्यामुळे भुतेही अडचणीत येणार आहे. निंबाळकर जिल्हा परिषदेती काही नेत्यांच्या सूचनांवर कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्यांवर कारवाई करीत असल्याची आहे. निंबाळकर यांच्या आवाजाचे नमुने तपासण्यात येणार आहे. तसेच यात आणखी कोण सहभागी आहे,याचा तपास होणार असल्याने भुतेंसह अनेक जण अडचणीत येण्याची शक्‍यत वर्तविण्यात येत आहे. 

मुलगा पैसे घेऊन पळाला 
निंबाळकर एसीबीच्या सापळ्यात अडकताच त्यांच्या ड्रायव्हरने ही बाब फोन करून घरी सांगितली. एसीबीची चमू निंबाळकर यांच्या घरी झाडाझडतीसाठी पोहोचण्याच्या पूर्वीच निंबाळकरांचा मुलगा अक्षय रोख रक्कम, दागिने आणि मालमत्तेचे कागदपत्र घेऊन पसार झाला. त्यामुळे एसीबी आता अक्षयचाही शोध घेत आहे. 

बंगला, बायकोच्या नावे शेती 
निंबाळकर यांनी हनुमाननगर परिसरात मोठा बंगला बांधला. उमरेड येथे 9 एकर शेती तसेच अन्य ठिकाणी पत्नीच्या नावे 5 एकर शेती विकत घेतली आहे. उमरेड, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे बरीच मालमत्ता जमविली असल्याचा संशय एसीबीला आहे. एसीबी या संपत्तीचाही तपास करणार असल्याची माहिती आहे.

Web Title: nagpur news zp member bhute bribe accused of giving bribe