महापालिका सात रुपयांत देणार महावितरणला वीज

File photo
File photo

नागपूर : महापालिकेने कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्पाचे कंत्राट एस्सल ग्रुपला दिले असून तयार झालेली वीज महावितरणला देण्यात येणार आहे. महापालिका महावितरणला सात रुपये प्रतियुनिट दराने वीजविक्री करणार आहे. कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्पाच्या प्रत्यक्ष उभारणीस पुढील दोन महिन्यांत सुरुवात होणार असून पुढील वर्षी डिसेंबरमध्ये वीजनिर्मिती सुरू होईल.
जुलैमध्ये कचऱ्यातून वीजनिर्मिती प्रकल्पाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पार पडले. त्यानंतर या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मंगळवारी महापालिका, एस्सल ग्रुप व महावितरण यांच्यात मुंबईत वीज खरेदीसंबंधातील करार पार पडला अन्‌ प्रत्यक्ष कामावरही शिक्कामोर्तब झाले. या प्रकल्पासाठी हिताची ही कंपनी तांत्रिक भागीदार असून सध्या प्रकल्पाच्या डिझाईनचे काम करीत आहे. येत्या दोन महिन्यात डिझाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर लगेच भांडेवाडी येथील 10 एकर जागेत प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार असल्याचे "वेस्ट टू एनर्जी'चे प्रकल्प संचालक जीवन सोनवणे यांनी "सकाळ'शी बोलताना नमूद केले.
भूमिपूजनानंतर 24 महिन्यांच्या कालावधीत प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे. परंतु, प्रकल्पाचे बांधकाम पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये पूर्ण करून डिसेंबरपासून वीजनिर्मितीस प्रारंभ करण्यात येणार असल्याचे सोनवणे यांनी स्पष्ट केले.
800 टन कचऱ्यावर दररोज प्रक्रिया
या प्रकल्पामुळे महापालिकेची कचऱ्यावर प्रक्रियेची डोकेदुखी कमी होणार आहे. एस्सल ग्रुप दररोज 800 टन कचरा वीजनिर्मितीसाठी महापालिकेकडून घेणार आहे. या कचऱ्यातून 11.5 मेगावॉट वीजनिर्मिती होईल.
पारडी उपकेंद्राला वीज
भांडेवाडी येथे तयार झालेली वीज पारडी येथील वीज उपकेंद्राला देण्यात येईल. येथून ही वीज महावितरणकडे वळती केली जाईल. जबलपूरच्या वीजनिर्मिती प्रकल्पाच्या धर्तीवर हा प्रकल्प तयार करण्यात येत आहे.
जमिनीत पुरणार राख
या प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात राख तयार होणार असून ती जमिनीत पुरली जाणार आहे. या प्रकल्पाच्या आराखड्याला महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंजुरी दिली असून प्रत्यक्ष प्रकल्प सुरू होण्यापूर्वी आणखी एकदा मंजुरी घेतली जाणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com