वीस हजार इमारती कोसळण्याच्या स्थितीत

File photo
File photo

नागपूर : शहरात वीज हजार इमारती तीस वर्षांवरील आहे. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार 30 वर्षांवरील इमारतीचे ऑडिट करणे महापालिकेला बंधनकारक आहे. मात्र, या कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जात असून या 20 हजार इमारती कधीही कोसळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या इमारतीतील लाखावर नागरिकांचा जीव धोक्‍यात आला आहे. विशेष म्हणजे महापालिकेने "स्ट्रक्‍चरल ऑडिट'साठी नियुक्त केलेले तज्ज्ञांचे पॅनेलही कुचकामी ठरले आहे.
नुकताच मालमत्ता कर आकारणीसाठी शहरातील इमारतीचे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणातून शहरात 3,40,467 इमारती असून 30 वर्षांवरील 20 हजार इमारती असल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे यात 60 वर्षांवरील एक हजारांवर इमारतींचा समावेश आहे. या इमारती मोडकळीस आल्या आहेत. कुठल्याही क्षणी त्या कोसळण्याची शक्‍यता आहे. मात्र, या इमारतीतील नागरिक निश्‍चिंत आहेच, मात्र, महापालिकेनेही महाराष्ट्र महानगरपालिका कायद्याकडे दुर्लक्ष केले आहे. या कायद्यानुसार महापालिकेने दरवर्षी या इमारतीचे ऑडिट करणे अपेक्षित आहे. झोनच्या सहायक आयुक्तांवर ही जबाबदारी देण्यात आली आहे. झोन अधिकाऱ्यांनी अशा इमारतीची यादी तयार करून संबंधितांना नोटीस पाठविण्याची गरज आहे. परंतु, या गंभीर विषयाकडे दुर्लक्ष करण्यात आले. महापालिकेने तज्ज्ञांचे पॅनेल नियुक्त केले. परंतु, इमारत मालकही त्यांच्याकडे फिरत नाही. एकूणच महापालिका व इमारत मालक, तेथील निवासी सारेच भविष्यातील संकटापासून अनभिज्ञ दिसून येत आहे. जुन्या जीर्ण इमारतीचे दरवर्षी ऑडिट करणे आवश्‍यक आहे. त्यामुळेच ती इमारत धोकादायक आहे की नाही, हे स्पष्ट होते. मात्र, याकडे कुणीही लक्ष देण्यास तयार नसल्याने एखादवेळी मोठा अपघात घडण्याची शक्‍यता बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
दहा वर्षांत 1 लाख 33 इमारतींची भर
गेल्या काही वर्षांत शहरात मोठ्या प्रमाणात इमारत बांधकाम झाले. 2008 ते 2018 या दहा वर्षात शहरात 1 लाख 33 हजार 147 नवीन इमारतीचे बांधकाम झाले. त्यापूर्वी 1998 ते 2007 या दहा वर्षात 1,45,241 नवीन इमारती बांधण्यात आल्या आहेत. 1988 ते 1997 या दहा वर्षात 42,063 इमारतीचे बांधकाम करण्यात आले. अर्थात गेल्या वीस वर्षांत इमारत बांधकामात मोठी गती आल्याचे दिसून येत आहे. शहरात 1978 ते 1987 या काळातील 13 हजार 133 तर 1968 ते 1977 या काळातील 4 हजार 93 इमारती आहेत. 1958 ते 1967 या काळातील 1,715 इमारती असून त्यापूर्वीच्या 1 हजार 86 इमारती आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com