एकीशी प्रेम, दुसरीशी विवाह; नवरदेव पोहोचला कारागृहात

अनिल कांबळे
सोमवार, 16 एप्रिल 2018

नागपूर : एकीशी प्रेम करून दुस-या मुलीसोबत विवाह करणारा नवरदेव विवाहाच्या दुस-याच दिवशी स्वागत समारंभापूर्वीच कारागृहात पोहोचला. सुधाकर भाविकसिंग राठोड (३०) रा. महात्मा फुलेनगर, मानेवाडा रोड असे आरोपीचे नाव आहे.

आरोपी हा मूळचा हिंगणघाट येथील रहिवासी असून तो उमरेड मार्गावरील अडवानी ढाब्यावर व्यवस्थापक आहे.

१६ मे २०१६ ला एका कार्यक्रमातून पीडित २९ वर्षीय मुलीसोबत त्याची ओळख झाली. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पीडित मुलीला त्याचे लग्नाचे आमिष दाखवले व अजनी पोलीस निवासी संकुलात तिच्यावर वारंवार अत्याचार केला. मात्र, त्याने तिला अंधारात ठेवून एका दुस-याच मुलीसोबत १४ एप्रिलला विवाह केला.

त्याचा स्वागत समारंभ १८ एप्रिलला आहे. तत्पूर्वी पीडित तरुणीने अजनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश शंखे यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पीडित मुलगी एम. ए. शिक्षण घेतलेली असून पूर्वी खासगी नोकरी करायची.

Web Title: Nagpur Police arrested fraud bridegroom