अखेर लाचखोर पोलिस निरीक्षक आला शरण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 जानेवारी 2020

नागपूर : भूमी अभिलेखच्या महिला अधिकाऱ्याला अडीच लाखांची लाच मागितल्याप्रकरणात फरार असलेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा लाचखोर पोलिस निरीक्षक पंकज शिवरामजी उकंडे (रा.त्रीमूर्तीनगर) अखेर गुरुवारी पोलिसांना शरण आला. एसीबीच्या पथकाने त्याला अटक केली. 

नागपूर : भूमी अभिलेखच्या महिला अधिकाऱ्याला अडीच लाखांची लाच मागितल्याप्रकरणात फरार असलेला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा लाचखोर पोलिस निरीक्षक पंकज शिवरामजी उकंडे (रा.त्रीमूर्तीनगर) अखेर गुरुवारी पोलिसांना शरण आला. एसीबीच्या पथकाने त्याला अटक केली. 

उकंडेला शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. गेल्या 24 डिसेंबरला एसीबीने उकंडे यांच्याविरुद्ध सदर पोलिस स्टेशनमध्ये लाच मागितल्याचा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्यात तो फरार होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 नोव्हेंबरला उकंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी एक लाख रुपयांची मागणी केल्याप्रकरणी सिटी सर्व्हेतील सर्व्हेअर आश्रय मधुकर जोशी (वय 50) यांना अटक केली होती. याप्रकरणाचा तपास उकंडे यांच्याकडे होता. या प्रकरणाच्या तपासात सिटी सर्व्हेतीलच एका महिला अधिकाऱ्याचा सहभाग असल्याचे उकंडे यांनी महिलेला सांगितले. याप्रकरणात सहआरोपी न करण्यासाठी उकंडे यांनी महिलेला दोन लाख रुपयांची तर जोशी यांची वाढीव एसीबी कोठडी न घेण्यासाठी 50 हजार अशी एकूण अडीच लाख रुपयांची लाच मागितली. महिलेने याबाबत एसीबीच्या अधीक्षक रश्‍मी नांदेडकर यांच्याकडे तक्रार केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उकंडे याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान उकंडेने लाच मागितल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर हा अहवाल लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांकडे पाठविण्यात आला. महासंचालक कार्यालयाने उकंडेच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले. सदर पोलिस स्टेशनमध्ये लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. लाच मागितल्याची तक्रार आल्याचे कळताच उकंडे आजारी रजा घेऊन सुटीवर गेला. काही दिवस नागपुरात राहिल्यानंतर तो मुंबई येथे वास्तवास होता. गत काही दिवसांपासून तो अकोला येथे दडून बसले होता. अटक टाळण्यासाठी उकंडेने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यानंतर तो गुरुवारी उकंडे एसीबी पथकाला शरण गेले. 

अबब! प्रतिष्ठित व्यक्ती कुंटणखान्याचे ग्राहक

एसीबीची प्रतिमा झाली मलिन 
शासकीय खात्यातील लाचखोरांवर अंकुश ठेवण्याची जबाबदारी एसीबीकडे आहे. मात्र, एसीबीतच लाचखोर पोलिस भरलेले असतील तर सामान्यांना न्याय मिळणार नाही. उकंडे याने यापूर्वीही काही तक्रारदारांकडून आणि आरोपींकडून पैसे घेतले असावे. असे लाचखोर एसीबीत असतील तर ट्रॅप यशस्वी होणार नाहीत. त्यामुळे या प्रकारामुळे एसीबीची प्रतिमा मलिन झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, police inspector, bribe, surrender