नागपूर पोलिस "श्रीं'च्या विसर्जनासाठी सज्ज ! 

police-k.jpg
police-k.jpg

नागपूर : दहा दिवस मुक्‍कामी असलेल्या बाप्पांना निरोप देण्याची वेळ आली असून शहर पोलिस "श्रीं'च्या विसर्जनासाठी असलेल्या बंदोबस्तासाठी सज्ज आहेत. आज बुधवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारा नागपूर शहर पोलिस दलाचे प्रमुख पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी फुटाळा तलावावर बंदोबस्ताचा आढावा घेतला.

बंदोबस्तासाठी तैनात पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्‍यक त्या सूचना दिल्या. तसेच वाहतूक पोलिस उपायुक्‍त चिन्मय पंडित यांनी शहरातील वाहतूकीचा आढावा घेऊन विसर्जनासाठी मिरवणुकीचे मार्ग ठरवून दिले. तसेच कर्मचाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

गणेश विसर्जनासाठी नागरिकांनी तसेच गणेशभक्‍तांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी केले. यावेळी सहआयुक्‍त रविंद्र कमद, अप्पर पोलिस आयुक्‍त निलेश भरणे, डॉ. शशिकांत महावारकर, वाहतूक शाखेचे उपायुक्‍त चिन्मय पंडित, गुन्हे शाखेचे उपायुक्‍त गजानन राजमाने, पोलिस उपायुक्‍त विनीता शाहू, पोलिस उपायुक्‍त श्‍वेता खेडकर, पोलिस उपायुक्‍त विक्रम साळी, पोलिस निरीक्षक अतुल सबनिस, जयेश भांडारकर, सुनील गांगुर्डे आणि अंबाझरीचे ठाणेदार विजय करे उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com