रेल्वेस्थानकाचे पूर्वद्वार होणार स्मार्ट 

योगेश बरवड
मंगळवार, 28 मार्च 2017

नागपूर - रेल्वे मंत्रालयाकडून उत्पन्नवाढीचे नवे स्त्रोत शोधले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून रेल्वेच्या जमिनींचा वाणिज्यिक वापर करण्यात येणार आहे. नागपूर रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील भागातही भव्य मल्टिस्टोरेज इमारत उभारून वाणिज्यिक वापर करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत या भागाला ‘स्मार्ट लूक’ देण्याचे प्रयत्न सुरू असून त्यासाठी स्मार्ट सीटी योजनेशी संबंधित विभागाची रेल्वेच्या डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनशी  चर्चा सुरू आहे.

मेट्रोसिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या उपराजधानीत अनेक आंतरराष्ट्रीय प्रकल्प येऊ घातले आहेत. स्मार्ट सिटीअंतर्गत शहराचा चेहरा-मोहराच पालटण्याचे प्रयत्न आहेत. विकासाची गती लक्षात घेता नागपूर आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाचे शहर ठरणार आहे. यामुळेच देशाच्या  मध्यभागी असलेल्या नागपूर रेल्वेस्थानकाचाही आंतरराष्ट्रीय दर्जानुसार विकासाचा प्रस्ताव आहे. पण, पश्‍चिमद्वारावर जागा नसल्याने विकासावर मर्यादा आहेत. याउलट पूर्वेकडील भागात मोठ्या प्रमाणावर रेल्वेची मोकळी जागा आहे. रस्त्यापलीकडे कॉटनमार्केट ते संत्रामार्केटपर्यंतच्या भागात पुनर्विकासाची मोठी संधी आहे. किंबहुना तसे प्रयत्नही सुरू झाले आहेत. याच भागातून मेट्रो  रेल्वे जाणार आहे. कॉटनमार्केटजवळ एकाचवेळी आठशे ते हजार गाड्या उभ्या राहतील, अशी मल्टिस्टोअरेज इमारत उभारण्यात येणार आहे. म्हणजेच आगामी काळात रेल्वेस्थानकाच्या पूर्वेकडील भागात विकासकामांची गर्दी होणार असून, पर्यायाने भव्य बाजारपेठच निर्माण होणार आहे. 

यामुळे पूर्वेकडील भागाचा वाणिज्यिक वापराद्वारे मोठ्या उत्पन्नाचा शाश्‍वत स्रोत रेल्वेसाठी निर्माण होऊ शकतो. ही संधी इनकॅश करून घेण्यासाठी रेल्वेप्रशासन कामाला लागले आहे. स्मार्ट सिटी योजनेशी संबंधित विभाग आणि रेल्वेचा अंग असलेले डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन यांच्यात चर्चेच्या फैरी सुरू झाल्या आहेत. मल्टिस्टोअरी इमारत बांधली जाण्याची दाट शक्‍यता निर्माण झाल्याने याभागातील विकासकामांना प्रशासनाने अचानक ब्रेक लावले आहे. विकासकामातील खोळंबा बरेच काही सांगून जातो.

अपुऱ्या जागेमुळे पश्‍चिमेकडील भागात विकासाची कोणतीच शक्‍यता नाही. त्या मानाने पूर्वेकडे विकासाची मोठी संधी आहे. विकासकामांबाबत प्राथमिक चर्चा सुरू आहेत. वाटाघाटीतून होणाऱ्या निर्णयाकडे प्रशासनाचे लक्ष असून सध्या वेट ॲण्ड वॉचच्या भूमिकेत आहोत.
.
- ब्रजेशकुमार गुप्ता,विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नागपूर विभाग, मध्य रेल्वे.

Web Title: nagpur railway station smart