नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी साईबाबाला जन्मठेप

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

नागपूर : नक्षलवाद्यांशी संबंध ठेवल्याप्रकरणी प्राध्यापक जी. एन. साईबाबा याच्यासह अन्य पाच जणांना गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने आज (मंगळवार) जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

प्रा. साईबाबा, जेएनयूचा विद्यार्थी हेम मिश्रा, प्रशांत राही, विजय तिरकी, महेश तिरकी व पांडू नरोटे यांना शिक्षा सुनावण्यात आली आहे. देशविघातक कृत्य, बंदी संघटनांचा सदस्य असणे, प्रचार करणे आदी गुन्ह्यांमध्ये दोषी ठरवत न्यायालयाने शिक्षा सुनावली. विजय तिरकीला 10 वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

प्रा. साईबाबा हा दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. 9 मे 2014 रोजी अटक झाली त्यावेळी साईबाबाकडे नक्षलींशी संबंधित साहित्य आढळले होते. गडचिरोली पोलिसांनी दिल्लीतून साईबाबाला अटक केली होती. कथित माओवादी हेम मिश्रा यालाही गडचिरोली पोलिसांनी अटक केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने याप्रकरणाची स्वत:हून दखल घेतल्यानंतर साईबाबाला 31 डिसेंबर 2015 पर्यंत तात्पुरता जामीन मंजूर केला होता. यामुळे त्याला सोडण्यात आले होते.

मुंबई उच्च न्यायालयाने साईबाबाला जामीन कायम करण्यासाठी नागपूर खंडपीठात अर्ज करण्यास सांगितले होते. त्यानुसार साईबाबाने ऑक्टोबर 2015 मध्ये नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला होता. या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने हा खटला दररोज चालवण्याचे आदेश दिले होते. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याची जामिनावर सुटका करण्यात आली होती. दररोज सुनावणी घेऊन हा खटला लवकरात लवकर निकाली लावण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. या आदेशांनंतर खटल्याला वेग आला. मात्र, सुनावणी दरम्यान गडचिरोली जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांना दोषी ठरवले आहे.

Web Title: nagpur: saibaba sentenced life imprisonment