नागरिकांची पाठ अन्‌ विक्रेत्यांचं चांगभलं 

राजेश प्रायकर 
मंगळवार, 23 मे 2017

नागपूर - शहरातील फूटपाथ एक ते दीड फूट उंच असल्याने लहान मुले, वृद्धांसाठी ते कुचकामी ठरले आहेत. परिणामी नागरिकांनी फूटपाथकडे पाठ फिरविली. त्यामुळे त्यावर  अतिक्रमण करून विक्रेत्यांचे फावले. मुळात फूटपाथवरील अतिक्रमण हटविण्यासाठी दररोज कर्मचारी, वाहनांवर खर्च करीत आहे. मात्र, महापालिकेनेच सदोष फूटपाथ बांधून त्यांना आमंत्रण दिल्याचे चित्र असून, त्यांना हटविण्यासाठीचा खर्च व्यर्थ जात आहे. 
शहरात जवळपास चार किलोमीटरचे रस्ते असून त्यातील निम्म्या रस्त्यांना फूटपाथच नाही.

शहरातील प्रमुख रस्त्यांच्या कडेला नागरिकांसाठी फूटपाथ तयार करण्यात आले आहे. परंतु, या फूटपाथवर नागरिकांना चालण्याऐवजी भाजीविक्रेते, कुठे पान, आइस्क्रीम विक्रेत्यांनी गर्दी केली. अतिक्रमणधारकांनी फूटपाथ गिळंकृत केल्यामुळे नागरिकांना रस्त्यांवरून चालावे लागत असून, त्यांच्यावर अपघाताची टांगती तलवार आहे. मात्र, ही बाब केवळ ५० टक्के खरी असल्याचे यातील तज्ज्ञांचे मत आहे. मुळात शहरातील फूटपाथच चालण्यासाठी योग्य नसल्याचे दिसून येत आहे. प्रत्येक रस्त्यांतील फूटपाथची उंची सारखी नसून, कुठे रुंदी जास्त, तर कुठे कमी  असल्याचे ठिकठिकाणी दिसून येते. शहरातील काही भागात रस्त्यांपेक्षा एक ते दीड फूट उंच फूटपाथ आहेत. लहान मुलांना या फूटपाथवर चढण्यासाठी त्रास्त होत असतानाच वृद्धांचीही स्थिती तशीच आहे. अशा सदोष फूटपाथवरून चालण्याऐवजी नागरिकांना रस्त्यालाच चालण्यासाठी  पसंती दिली. फूटपाथवरून कुणीही चालत नसल्याने तेथे अवैध पार्किंगसह अतिक्रमणधारकांनी दुकाने थाटली. काही दुकानदारांनीच ते कवेत घेतले आहे. त्यामुळे प्रमुख रस्त्यांवरील पादचाऱ्यांची गर्दी वाढली असून वाहतुकीची कोंडीसारख्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. फूटपाथसाठी इंडियन रोड काँग्रेसची मार्गदर्शक तत्त्वे आहेत. मात्र, या मार्गदर्शक तत्त्वांना महापालिकेने तिलांजली दिल्याचे चित्र आहे. 

Web Title: Nagpur salesmanship