लाचखोरीत नागपूर राज्यात द्वितीय

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 डिसेंबर 2018

नागपूर : राज्यातील सर्वच शासकीय खात्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. नागरिकांचे कोणतेही काम लाच घेतल्याशिवाय अधिकारी करीत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यात भ्रष्टाचारात पुण्याने प्रथम क्रमांक पटाकवला आहे, तर राज्याची उपराजधानी द्वितीय क्रमांकावर आहे. तसेच औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणारे औरंगाबाद भ्रष्टाचारात तिसऱ्या स्थानावर कायम आहे.

नागपूर : राज्यातील सर्वच शासकीय खात्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. नागरिकांचे कोणतेही काम लाच घेतल्याशिवाय अधिकारी करीत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. राज्यात भ्रष्टाचारात पुण्याने प्रथम क्रमांक पटाकवला आहे, तर राज्याची उपराजधानी द्वितीय क्रमांकावर आहे. तसेच औद्योगिक शहर म्हणून ओळखल्या जाणारे औरंगाबाद भ्रष्टाचारात तिसऱ्या स्थानावर कायम आहे.
राज्यामध्ये एसीबीचे नागपूर, मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, अमरावती, औरंगाबाद, नांदेड असे आठ विभाग आहेत. या वर्षात 6 डिसेंबरपर्यंत एसीबीने 824 सापळे लावले असून 1,093 लाचखोर लोकसेवकांना अटक केली आहे. पुणे विभागात एसीबीने यावर्षी सर्वाधिक 180 सापळे लावले असून त्यापाठोपाठ नागपूर (119) तर 108 सापळ्यांसह औरंगाबाद तिसऱ्या स्थानावर आहे. नागपूर विभागात एसीबीने 119 सापळे लावले असून यात नागपूर (20), गडचिरोली (13), भंडारा (23), वर्धा (12), गोंदिया (24) आणि चंद्रपूर (27) आदींचा समावेश आहे. महसूल आणि पोलिस विभागांमध्ये सर्वाधिक भ्रष्टाचार आहे. यामध्ये आरटीओ विभागही कुठे कमी नाही. सर्वाधिक लाचखोरीचे प्रमाण पोलिस विभागात असल्याचे दिसून येते. मात्र, यावेळी महसूल विभाग प्रथम क्रमांकावर आहे.
महसूल विभाग टॉपवर
लाचखोरीमध्ये महसूल विभाग दरवर्षीप्रमाणे यावर्षीही टॉपवर आहे. महसूल विभागातील भ्रष्टाचाराची 201 प्रकरणे उघडकीस आली असून 253 जणांना अटक करण्यात आली आहे. सरकारच्या अनेक योजना असून या योजनांचे फायदे मिळवून देण्यासाठी लोकसेवकांकडून लाच घेतली जाते. द्वितीय स्थानावर पोलिस विभाग आहे. 119 सापळ्यांमध्ये 239 पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांना एसीबीने अटक केली. तृतीय स्थानावर पंचायत समिती असून 87 सापळ्यांमध्ये 113 लाचखोरांना अटक केली.
जणजागृतीची कमतरता
भ्रष्टाचारमुक्तीसाठी एसीबी तसेच सरकारी यंत्रणातर्फे वेगवेगळ्या माध्यमातून जनजागृती केली जाते. मात्र, ती पुरेशी राहत नाही. अनेकांना एसीबीचे कार्यालय माहिती नसते, तर काहींना एसीबीचा हेल्पलाइन क्रमांक माहीत नसतो. अनेक शासकीय कार्यालयांत जर पोस्टर किंवा भित्तिपत्रके लावल्यास शासकीय कर्मचारी फोडून टाकतात.

विभागवार कारवाई
विभाग सापळा अपसंपदा भ्रष्टाचार
मुंबई 39 5 0
ठाणे 96 2 2
पुणे 179 1 3
नाशिक 101 7 1
नागपूर 119 2 13
अमरावती 96 0 3
औरंगाबाद 107 3 0
नांदेड 83 1 1

पहिले पाच लाचखोर विभाग
खाते प्रकरणे अटक
महसूल 201 - 253
पोलिस 178 - 236
पंचायत समिती 86 - 112
म. रा. वि. कंपनी 46 - 60
महापालिका 42 - 60

Web Title: Nagpur second in bribery case