अवैध धंदे : 2 पोलिस उपनिरीक्षकांसह 7 निलंबित

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 मार्च 2017

नागपूर : येथील पोलिसांनी अवैध धंद्यांवर कायद्यानुसार अपेक्षित कारवाई न केल्याबद्दल, तसेच कर्तव्यात कसर केल्याच्या आरोपावरून 2 पोलिस उपनिरीक्षकांसह 7 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. 

नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पोलिसांच्या ढिसाळ कारभाराला धक्का देत ही कारवाई केली. निलंबित पोलिस सावनेर, खापा, कळमेश्वर आणि मौदा पोलिस स्टेशनचे आहेत. या भागात अवैध धंदे, जुगार, सट्टा आणि ताश क्लब चालत असल्याची माहिती असताना त्याकडे दुर्लक्ष केल्याचा निलंबित कर्मचाऱ्यांवर आरोप होता. त्यानंतर पोलिस अधीक्षकांनी निलंबनाची कारवाई केली.

नागपूर शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत आहे. त्यातच पोलिस कर्मचाऱ्यांकडून अवैध धंद्यांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप होत होता. त्यानंतर पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी कडक पाऊल उचलत सात कर्मचाऱ्यांचं निलंबन केलं आहे.
 
Web Title: nagpur sp balkawade suspends 7 policemen avoiding illegal business