नागपूरचा पारा  ४४.१ अंशांवर

नागपूरचा पारा  ४४.१ अंशांवर

नागपूर - विदर्भात उन्हाच्या लाटेचा प्रभाव दिवसेंदिवस वाढू लागला आहे. रविवारी ढगाळ वातावरण असूनही नागपूरच्या कमाल तापमानात वाढ झाली. तर चंद्रपूर येथे राज्यातील उच्चांकी तापमानाची नोंद करण्यात आली. प्रादेशिक हवामान विभागाचा इशारा लक्षात घेता, या आठवड्यात लाट आणखी तीव्र होण्याची शक्‍यता आहे. 

मॉन्सूनच्या प्रतीक्षेत असलेले वैदर्भी सध्या उन्हाच्या लाटेने चांगलेच घामाघूम झाले आहेत. बुलडाण्याचा अपवाद वगळता सर्वच जिल्ह्यांमध्ये पारा ४२ अंशांपार पोहोचला आहे. शनिवारी ४३.९ अंशांपर्यंत घसरलेल्या नागपूरच्या पाऱ्याने आज पुन्हा ४४.१ अंशांपर्यंत उसळी घेतली. याशिवाय चंद्रपूर येथे ४५.६ अंश सेल्सिअस व ब्रह्मपुरी येथे ४५.५ अंश सेल्सिअस  तापमानाची नोंद करण्यात आली. ढगाळ वातावरणामुळे दिवसभर चटक्‍यांसोबतच उकाडाही जाणवला. लाटेमुळे शहरात उष्माघाताचे रुग्ण वाढले आहेत. लवकरच नवतपा सुरू होणार असल्याने उन्हाचा तडाखा आणखी वाढणार आहे. काही जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ४७ अंशांपर्यंत जाण्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com