तापमान कमी, चटके कायम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

नागपूर - गेल्या नऊ दिवसांपासून विदर्भात सुरू असलेला उन्हाचा तडाखा सोमवारीही कायम राहिला. नागपूर, चंद्रपूर आणि ब्रह्मपुरीसह बहुतांश जिल्ह्यांमध्ये तापमान किंचित खाली आले असले तरी, उन्हाचे चटके व उकाडा मात्र ‘जैसे थे’ होता. लवकरच नवतपा सुरू होत असल्यामुळे उष्णलाट आणखी तीव्र होण्याची शक्‍यता हवामान विभागातर्फे वर्तविण्यात आली आहे. 

चंद्रपूरवासींनी काल या मोसमातील ‘हॉट संडे’ (४६.८ अंश सेल्सिअस) अनुभवल्यानंतर उच्चांकी तापमानात सोमवारी ४६.६ अंशांपर्यंत घट झाली. ब्रह्मपुरी येथेही पारा ४६.५ वरून ४५.३ अंशांपर्यंत खाली आला. नागपूरकरांनाही (४५.५ अंश सेल्सिअस) रविवारच्या तुलनेत थोडाफार दिलासा मिळाला. सोमवारी नागपूरचे कमाल तापमान ४४.९ अंशांवर आले. वर्धा (४४.२ अंश सेल्सिअस), गोंदिया (४३.८ अंश सेल्सिअस) आणि यवतमाळ (४२.५ अंश सेल्सिअस) येथेही तापमानात घट झाल्याचे दिसून आले. ऊन व उकाड्यामुळे नागपूरकर कमालीचे त्रस्त आहेत.

उन्हामुळे दुपारच्या वेळेस रस्त्यांवरील वर्दळ कमी झाली असून, शीतपेयांच्या दुकानांसमोर गर्दी वाढल्याचे चित्र शहरात जागोजागी पाहायला मिळत आहे. 

विदर्भातील तापमान 
अंश सेल्सिअसमध्ये 
नागपूर     ४४.९ 
अकोला     ४३.३ 
अमरावती     ४१.२ 
बुलडाणा     ४०.२ 
ब्रह्मपुरी     ४५.३ 
चंद्रपूर     ४६.६ 
गोंदिया     ४३.८ 
वर्धा     ४४.२
वाशीम     ४१.८ 
यवतमाळ     ४२.५

Web Title: Nagpur temperature