शुल्कवाढीचा निर्णय मागे

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

नागपूर  - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने वसतिगृहाच्या शुल्कामध्ये दुपटीने वाढ केली होती. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड रोष निर्माण झाला होता. सामान्य वगार्तील विद्यार्थ्यांनी शिक्षण सोडून द्यावे का? असा सवाल करीत विद्यार्थी संघटनांनी आंदोलनही केले होते. त्यानंतर कुलगुरूंनी वसतिगृह शुल्क वाढीचा निर्णय व्यवस्थापन परिषदेत चर्चेला ठेवला असून शुल्कामध्ये केवळ पाच टक्के म्हणजे शंभर रुपयांची वाढ करण्यात आली. विशेष म्हणजे १७ वर्षांनंतर विद्यापीठाने वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.

नागपूर हे देशाच्या मध्यभागातील शहर असल्याने विद्यापीठामध्ये मुख्यत: विदर्भासह अन्य राज्यांतील विद्याथीर्ही शिक्षण घेतात. त्यामुळे बाहेरील विद्यार्थ्यांना राहण्याची सोय व्हावी म्हणून विद्यापीठाने काही वसतिगृहांची निर्मिती केली आहे. लॉ कॉलेज वसतिगृह, औषधीनिर्माण शास्त्र वसतिगृह, मुलींचे वसतिगृह आणि विदेशी विद्यार्थ्यांचे वसतिगृह अशी चार वसतिगृहे शहरात आहेत. 

या चार वसतिगृहांपैकी विदेशी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे शुल्क हे जास्त आहे. तर अन्य वसतिगृहांचे शुल्क हे आतापर्यंत तीन हजारांच्या घरात आहे. मात्र, विद्यापीठाने शैक्षणिक सत्र - पासून या शुल्कामध्ये दुपटीने वाढ केली होती. त्यामुळे पुढील शैक्षणिक सत्रामध्ये वसतिगृहामध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सात हजार रुपयांचे शुल्क मोजावे लागणार होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड आर्थिक भार सहन करावा लागणार होता. याविरोधात विद्यार्थी संघटनांनी शुल्क वाढ मागे घेण्याची मागणी केली. त्यावर विद्यापीठानेही सकारात्मक विचार करीत शुल्क कपातीचा निर्णय घेतला. त्यामुळे आता सामान्य विद्यार्थ्यांनाही वसतिगृहाचा लाभ घेता येणार आहे.

व्यवस्थापन परिषदेने वसतिगृह शुल्कामध्ये वाढ करण्याचा मागे प्रस्ताव दिला होता. मात्र, हे मलाही फारसे पटणारे नव्हते. त्यामुळे मंगळवारी झालेल्या बैठकीत हा विषय पुन्हा चर्चेला ठेवला असून शुल्कवाढीचा निर्णय मागे घेतला आहे. विद्यार्थ्यांवर कुठलाही अतिरिक्त भार पडू देणार नाही हीच विद्यापीठाची भूमिका आहे.
- डॉ. सिद्धार्थविनायक काणे, कुलगुरू

Web Title: nagpur university hostel fee issue