विद्यापीठाचे आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्र 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे बौद्ध अध्ययन केंद्र उभारले. शनिवारी (ता. 28) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत याचे लोकार्पण होईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय दर्जाचे बौद्ध अध्ययन केंद्र उभारले. शनिवारी (ता. 28) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत याचे लोकार्पण होईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

ग्रंथालय परिसरातील वास्तूचे उद्‌घाटन झाल्यानंतर मुख्य सोहळा विद्यापीठाच्या दीक्षान्त समारंभ परिसरात सायंकाळी होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मदीक्षा देऊन नागपूरला जागतिक महत्त्व प्राप्त करून दिले. त्यामुळे जगातील बौद्ध तत्त्वज्ञानाचे संशोधक व अभ्यासक नागपूरचे आकर्षण आहे. अनेक संशोधक विद्यार्थी नागपूर विद्यापीठात संशोधन करण्यास उत्सुक आहेत. मात्र, येथे सुसज्ज व सर्व सुविधायुक्त बौद्ध अध्ययन केंद्र नसल्याने विदेशी विद्यार्थी नागपुरात येत नाहीत. त्यामुळे शहरात आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्र स्थापन करण्याची गरज लक्षात घेता त्यादृष्टीने रामदासपेठ येथील विद्यापीठ ग्रंथालय परिसरात बौद्ध अध्ययन केंद्राची वास्तू उभारण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. या वास्तूचे बांधकाम अतिशय जलदगतीने पूर्ण करण्यात आले. संपूर्ण देशात आंतरराष्ट्रीय बौद्ध अध्ययन केंद्राच्या एवढ्या भव्य वास्तूची निर्मिती करणारे नागपूर विद्यापीठ पहिलेच आहे, अशी माहिती कुलगुरूंनी दिली. 

लोकार्पण सोहळ्याला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे व सुप्रसिद्ध बौद्ध विचारवंत भदन्त विमलकीर्ती गुणसिरी यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू अध्यक्षस्थानी राहणार असून, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांची उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुरणचंद्र मेश्राम यांनी केले. 

असे आहे बौद्ध अध्ययन केंद्र 
सद्यस्थितीत या दुमजली इमारतीत तळमजल्यावर केंद्र संचालकांचा कक्ष, प्राध्यापकांचे दोन कक्ष, ग्रंथालय, वाचनकक्ष, दोन संगणक कक्ष, चार वर्गखोल्या, एक कार्यालय व एक महिला कक्ष आहे. पहिल्या माळ्यावर पाली-प्राकृत विभाग राहणार असून, यात विभागप्रमुखांचा कक्ष, तसेच तीन प्राध्यापक कक्ष, प्रपाठक कक्ष, ग्रंथालय, भांडार कक्ष, दोन संगणक कक्ष, तीन वर्गखोल्या, संशोधन छात्रकक्ष, कार्यालयीनकक्ष तसेच सेमिनार हॉलची निर्मिती केली आहे. 

Web Title: nagpur University International Buddhist Learning Center