अधिष्ठात्यांची नियुक्ती लवकरच 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने नवीन कायद्यानुसार सर्व अभ्यासक्रमांचे विभाजन चार विद्याशाखांमध्ये केले. या विद्याशाखांच्या पूर्णवेळ अधिष्ठात्यांची नियुक्ती लवकरच होणार असून, याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारला पाठविल्याची माहिती प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी दिली. 

राज्य सरकारने राज्यातील सर्व विद्यापीठांकडून विद्याशाखांबाबतचा अंतिम ड्राफ्ट मागविला होता. यानुसार नागपूर विद्यापीठाने सरकारला प्रस्ताव पाठविला. विद्याशाखांवर निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. मात्र, प्राप्त माहितीनुसार विद्यापीठाने निर्धारित केलेल्या विद्याशाखांनाच राज्य सरकार मंजुरी देणार आहे. त्यात कुठलाही बदल करण्यात येणार नाही. यापूर्वी विद्यापीठात नऊ विद्याशाखा होत्या. नवीन कायदा पारित झाल्यानंतर विद्याशाखांची संख्या नऊवरून चारवर आली. नवीन विद्याशाखांमध्ये विज्ञान व तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, मानव्यशास्त्र आणि इंटर डिसिप्लिनरी यांचा समावेश आहे. इंटर डिसिप्लिनरीत गृहविज्ञान, औषधनिर्माणशास्त्र आणि शिक्षण शाखांचा समावेश केला आहे. 

विद्यापीठाने नवीन कायद्यानुसार चारही विद्याशाखांचा ड्राफ्ट तयार केला. सरकारने दिलेल्या मुदतीत आम्ही ड्राफ्ट पाठविला असून, लवकरच चारही अधिष्ठात्यांची नियुक्ती होइल, असा विश्‍वास आहे. 
-डॉ. प्रमोद येवले, प्र-कुलगुरू 

Web Title: Nagpur University issue