प्राध्यापकांची भरती करणार

File photo
File photo

नागपूर  : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ताकीद दिल्यामुळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने कार्यवाही सुरू केली असून, संलग्नित अनुदानित महाविद्यालयांना 18 जानेवारीच्या आत रिक्त पदांचा आकृतिबंध जमा करण्याचे आदेश दिल्याची माहिती प्रभारी कुलसचिव डॉ. नीरज खटी यांनी दिली.
प्राध्यापकांच्या 40 टक्के पदभरतीला सरकारने मान्यता दिली आहे. त्यानंतरही भरती प्रक्रिया थंडबस्त्यातच होती. सात जानेवारीला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी राज्यातील अकृषक विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. 28 फेब्रुवारीच्या आत पदभरती व्हायलाच हवी अशी ताकीद दिली आहे.
राज्यात 57 हजार नेट, सेट व पीएचडीधारक आहेत. दरवर्षी ही संख्या वाढत आहे. राज्यभरातील विविध महाविद्यालये, विद्यापीठात सुमारे साडेनऊ हजार पदे रिक्त आहेत. तरीही प्राध्यापकांची पदे भरली जात नाहीत. वर्षभरापासून राज्यभरात सीएचबीधारकांची वेगवेगळ्या पातळ्यांवर आंदोलने झाली. नोव्हेंबरला 40 टक्के पदभरतीचा निर्णय घेत अध्यादेश काढला होता. तावडे यांनी तंबी दिल्यानंतर विद्यापीठातर्फे एक ते 15 फेब्रुवारीच्या आत जाहिरात व अर्जप्रक्रिया पूर्ण करून 28 फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे आतातरी प्राध्यापक भरती होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तोंडाला पाने पुसल्याची भावना
राज्यातील महाविद्यालयांमधील प्राध्यापक पदांच्या भरतीबाबत सरकारचा निर्णय झाला व अध्यादेशही निघाला. महिनाभरानंतरही त्यावर कार्यवाही न झाल्याने राज्यभरात पात्रताधारकांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. सीएचबी प्राध्यापकांच्या मानधनामध्ये अपेक्षित वाढ न केल्याने; तसेच अनेक अटी घातल्यामुळे सरकारने तोंडाला पाने पुसल्याची भावना सीएचबीधारकांत आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com