प्रवेशबंदीविरोधात उच्च न्यायालयात लढाई

file photo
file photo

नागपूर, ता. 12 : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या आगामी नव्या शैक्षणिक सत्रात महाविद्यालयांतील 129 महाविद्यालयीन अभ्यासक्रमांवर बंदी घातली असून वारंवार विनंती केल्यानंतर ती हटविल्या जात नसल्याने संस्थाचालक आणि प्राचार्य फोरमने उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रवेशबंदी संदर्भात बुधवारी (ता. 12) धनवटे नॅशनल कॉलेज येथे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांच्या नेतृत्वात सर्वच संस्थाचालकांची बैठक घेण्यात आली. यात उपरोक्त निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाने 129 महाविद्यालयांतील विविध अभ्यासक्रमांना प्रवेशबंदी केली. या महाविद्यालयांची नावे अभ्यासक्रमासह संकेतस्थळावर टाकण्यात आली. अभ्यासक्रमांना एकही नियमित शिक्षक नसल्याने ही प्रवेशबंदी करण्यात आली. त्यासाठी 15 मे रोजी प्राचार्य फोरमकडून नियुक्‍त्यांवर बंदी असून "वन टाइम अप्रूव्हल'वर अभ्यासक्रमांचे संलग्नीकरण देण्याची मागणी केली होती. या प्रश्‍नावर फोरमकडून आंदोलन करायचे वा निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागायची यावर बराच खल झाल्याचे दिसते. यासंदर्भात राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी भेट घेऊन मार्ग काढण्याच्या उद्देशाने प्राचार्य फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी आमदार अनिल सोले यांची भेट घेतली. आमदार सोले यांनी त्यांना सर्व कागदपत्रासह शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेत, त्यांच्यासमोर ही समस्या मांडण्याचे आश्‍वासन दिले. त्यांनी शिक्षणमंत्र्यांकडेही गळ घातली. मात्र, त्याबद्दल अद्याप कुठलाही निर्णय झाला नसल्याचे दिसून येते.
दुसऱ्या कुठल्याच विद्यापीठात अशाप्रकारे प्रवेशबंदी करण्यात आलेली नाही. महाविद्यालयांची परिस्थिती आणि विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता, प्रवेशबंदी हटविण्याची गरज आहे. मात्र, विद्यापीठ त्याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे आता हा लढा न्यायालयात लढण्याचा निर्णय घेतला आहे.
-प्राचार्य, डॉ. आर. जी. टाले, सचिव, प्राचार्य फोरम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com