माजी विद्यार्थी करणार विभागांचा विकास

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

नागपूर  : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठामधील औषध निर्माणशास्त्र विभागातील माजी विद्यार्थ्यांनी दीड कोटी रुपये खर्चून सभागृहाची निर्मिती केली. याशिवाय अनेक संशोधन प्रकल्पासाठी निधी उभारण्याचे आश्‍वासन दिले. याचा आदर्श घेत, विद्यापीठाद्वारे विविध विभागांतील माजी विद्यार्थ्यांच्या संघटनांच्या माध्यमातून विभागांचा विकास करण्याची योजना आहे. यासंदर्भातील धोरणाबाबत व्यवस्थापन परिषदेत चर्चा करून धोरणात लवचिकता आणण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

विद्यापीठात चाळीसहून अधिक विभाग आहेत. यापैकी बरेच विभाग 50 पेक्षा अधिक वर्षे जुने आहेत. त्या विभागातून बरेच विद्यार्थी विविध कंपन्यांमध्ये आणि विविध सरकारी विभागात चांगल्या पदावर कार्यरत आहेत. विद्यापीठातील आपल्या विभागाप्रती वाटणारी आत्मीयता यातून विभागाला सर्वांगाने मदत करण्याचा त्यांचा मनोदय आहे. यापूर्वी विद्यापीठ परिसरातील औषध निर्माणशास्त्र विभागातील माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येत, स्वत:च्या खर्चातून विभागाला प्रशस्त सभागृह उभारून दिले. शिवाय संशोधनासाठी दहा कोटी देण्याचे आश्‍वासन दिले. या विभागातील बहुतांश विद्यार्थ्यांच्या स्वत:च्या औषध कंपन्या आहेत. त्यांच्या माध्यमातून येथील विद्यार्थ्यांना संशोधनासाठी सुविधा मिळाव्यात यासाठी विद्यापीठाला मदत करण्याचे ठरविले आहे. विद्यापीठाने हाच विचार पुढे नेत, यापुढे विद्यापीठातील गणित, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, सांख्यिकी आणि इतर जुन्या विभागातील माजी विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन त्यांच्या मदतीने विभागांचा विकास करण्याचे ठरविले आहे. विशेष म्हणजे विद्यापीठाने कामही सुरू केले असून त्यासंदर्भात बैठका सुरू केल्या आहेत.
औषधनिर्माण विभागातील सभागृहाला डॉ. डोरलेंचे नाव
विद्यापीठाच्या औषधनिर्माण विभागात तयार केलेल्या सभागृहाला डॉ. ए. के. डोरले यांचे नाव दिले आहे. डॉ. डोरले यांनी विभागाचे प्रमुख आणि वरिष्ठ प्राध्यापक म्हणून बरेच वर्षे सेवा दिली. विभागात दीड कोटी रुपये खर्चून हे सभागृह माजी विद्यार्थ्यांकडून बांधण्यात आले. याशिवाय गणित विभागातील सभागृहाला प्रसिद्ध गणितज्ज्ञ डॉ. श्रीनिवास रामानुजन यांचे नाव देण्यात येणार आहे.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur University will bring flexibility in policy