३५ सुवर्णांची धनी, पण वाली नाही कुणी!

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

नागपूर - पॉवरलिफ्टिंगसारख्या खेळात अल्फिया शेखने आतापर्यंत ३५ सुवर्णपदके जिंकली. नऊवेळा ‘स्ट्राँगेस्ट वुमन’चा किताब पटकावला. शिवाय आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही  ‘चॅम्पियन’ झाली. मात्र, या कामगिरीनंतरही ती उपेक्षेचे जीणं जगत आहे. हलाखीच्या परिस्थितीमुळे नागपूरकन्येला या खेळात टिकून राहण्यात अनेक अडचणी येताहेत. मदत किंवा नोकरी मिळाल्यास आपण खेळावर आणखी लक्ष केंद्रित करून नागपूरसह देशाला नावलौकिक मिळवून देऊ शकते, असे तिचे म्हणणे आहे.

काटोल रोड, फ्रेण्ड्‌स कॉलनीत राहणाऱ्या १९ वर्षीय अल्फिया शेखने तीन वर्षांपूर्वी पॉवरलिफ्टिंगमध्ये पाऊल ठेवले. कुणाचेही बळ नसताना अथक परिश्रम व स्वत:च्या गुणवत्तेवर अल्पावधीतच तिने यश संपादन केले. 

आर्थिक अडचणींमुळे तिला खेळात सध्या अनेक अडचणी येताहेत. अल्फियाच्या वडिलांचे छोटेसे ‘डेली नीड्‌स’चे दुकान असून, आई गृहिणी आहे.  त्यामुळे खेळसोबतच ती शिक्षण व खासगी नोकरी (जिम ट्रेनर) सुद्धा करीत आहे.

अल्फिया लास वेगास येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठीही पात्र ठरली आहे. 

या स्पर्धेसोबतच तिला जर्मनी व इंग्लंडमधील स्पर्धांमध्येही सहभागी व्हायचे आहे. त्यासाठी तिला पैशाची नितांत गरज आहे. नोकरी मिळाल्यास आपण खेळावर अधिकाधिक ‘फोकस’ करून देशाला आणखी पदके मिळवून देऊ शकते, असे अल्फियाने सांगितले.

संदीप जोशी घेणार पुढाकार
अल्फिया व तिच्यासारख्या शहरातील असंख्य गोरगरीब व प्रतिभावान खेळाडूंना मदत करण्याचे आश्‍वासन स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी दिले. ते म्हणाले, अल्फियाला खरोखरच मदतीची आवश्‍यकता आहे. विशेषत: तिला ‘डायट’साठी पैसे हवे आहेत. संदर्भात आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी अल्फियाची भेट घडवून देणार आहे. इतरही गुणवान खेळाडूंना मदतीची गरज असल्यास त्यांचीही नावे मला द्या, असेही ते म्हणाले.

Web Title: nagpur vidarbha alfia shaikh help by community