पहिल्या दिवशी एक हजार रोपांची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 जून 2017

नागपूर - ‘रोपे आपल्या दारी’ योजनेचा प्रारंभ रविवारी (ता. २५) फिरत्या स्टॉलला हिरवी झेंडी दाखवून वन सचिव विकास खारगे यांनी केला. पहिल्याच दिवशी एक हजार रोपांची नोंदणी करण्यात आली.

नागपूर - ‘रोपे आपल्या दारी’ योजनेचा प्रारंभ रविवारी (ता. २५) फिरत्या स्टॉलला हिरवी झेंडी दाखवून वन सचिव विकास खारगे यांनी केला. पहिल्याच दिवशी एक हजार रोपांची नोंदणी करण्यात आली.

या वेळी मुख्य वनसंरक्षक संजीव गौड, वनसंरक्षक अशोक गिरपुंजे, उपवनसंरक्षक जी. मल्लिकार्जुन, सामाजिक वनीकरणाचे उपसंचालक मोहन ढेरे व सहायक वनसंरक्षक एस. पी. उमाठे होते. वन विभागाच्या माध्यमातून तीन स्थायी स्टॉल सेमिनरी हिल्स नर्सरी, विमानतळावरील नर्सरी आणि अंबाझरी कार्यालयाच्या परिसरात सुरू करण्यात आले आहे. पाच फिरते स्टॉल लकडगंज, रेशीमबाग, वाडी नाका, काटोल नाका आणि दिघोरी नाका येथे सुरू केले आहेत. फिरत्या वाहनावरील स्टॉल सकाळी नऊ ते संध्याकाळी ६ या वेळेत उघडे राहतील. नागरिकांना पाच रोपे व संस्थेला २५ रोपे अल्पदरात मिळणार आहेत. रोपांची किंमत ६ ते ४१ रुपयांपर्यंत आहे. वन विभागाच्या माध्यमातून १ ते ७ जुलै या कालावधीत वेगवेगळ्या भागांमध्ये लोकांना रोपांचा पुरवठा करण्यासाठी वाहनाचा वापर करून रोपे लागवड करणाऱ्या नागरिकांच्या घरी पोहोचविण्यात येणार आहेत. विभागाला ८५ लाख ७० हजार रोपे लावण्याचे उद्दिष्ट आहे. त्यातील ६६ लाख ८६ हजार वनविभाग, ९ लाख ६८ हजार रोपे ग्रामपंचायती तसेच इतर विभाग व संघटना मंडळ ९ लाख सहा हजार वृक्षांची लागवड करणार आहे.

Web Title: nagpur vidarbha news 1000 tree registration