२० लाखांचा पानमसाला जप्त

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

नागपूर - लकडगंज आणि जरीपटक्‍यात राहणाऱ्या गुटख्याचा थोक व्यापार करणाऱ्या दोघांनी बंदी असलेला पानमसाला उत्तर प्रदेशातून ट्रकने नागपुरात आणला. गुन्हे शाखा पोलिसांनी या ट्रकची तपासणी करून २० लाख रुपयांचा पानमसाला जप्त केला. ही कारवाई मंगळवारी दुपारी करण्यात आली. ट्रकचालकासह व्यापाऱ्याच्या दलालाला पोलिसांनी अटक केली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात २० लाख रुपयांचा पानमसाला येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली. गोरख कुंभार यांनी पथकासह सापळा रचला. सीए रोडवर आंबेडकर चौकातून ट्रक जात असताना पोलिसांनी ट्रक अडविला. पोलिसांनी चालकाला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. त्यामुळे ट्रकची तपासणी केली असता २५० पोती खुल्ला पानमसाला आढळून आला. याची बाजारातील किंमत २० लाख रुपये आहे. ट्रकचालक करण विनोदसिंग गौतम (वय २२, बनवड, ता. मजनपूर, जि. कौसबीक, इलाहाबाद-उत्तर प्रदेश) आणि नागपुरातील दलालांचा पंटर पप्पू ऊर्फ रूबी शोभना कुशवाह (वय ३३, कुशीनगर, जरीपटका) यांना अटक केली. आरोपींनी शहरातील मोठा व्यापारी नवीन मिश्रा यांच्या मालकीचा पानमसाला असल्याची माहिती पोलिसांना दिली. 

नागपुरातून विल्हेवाट
छत्तीसगड राज्यातील रायपूर शहरात पानमसाला बनविण्याचा मोठा कारखाना आहे. जरीपटका आणि लकडगंजमधील दोन दलाल लाखोंमध्ये तेथील पानमसाला खरेदी करून नागपुरात आणतात. पप्पू कुशवाह हा कुरिअर बॉय असून तीन वर्षांपासून दलालांसाठी काम करतो. येथून संपूर्ण विदर्भात पानमसाल्याची विल्हेवाट लावण्यात येते. २० लाखांच्या पानमसाल्याची विक्री करून दलाल ५५ लाख रुपयांची कमाई करतात.

Web Title: nagpur vidarbha news 20 lakh rupees pan masala seized