आठ दिवसांत २,७०० वर अर्जविक्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 जून 2017

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विभागातील प्रवेश यावर्षीपासून केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी या पद्धतीला बराच प्रतिसाद दिला आहे. आठ दिवसांत दोन हजार ७६१ अर्जांची विक्री झाली असून त्यापैकी एक हजार १४४ अर्ज सादर करण्यात आले आहे. 

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विभागातील प्रवेश यावर्षीपासून केंद्रीय पद्धतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी या पद्धतीला बराच प्रतिसाद दिला आहे. आठ दिवसांत दोन हजार ७६१ अर्जांची विक्री झाली असून त्यापैकी एक हजार १४४ अर्ज सादर करण्यात आले आहे. 

विद्यापीठाने यावर्षी महाविद्यालयांमध्ये केंद्रीय पद्धतीने प्रवेश देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्य शासनाकडून त्याबद्धल काहीही निर्णय न झाल्याने विद्यापीठाने विभागातील ह्युमॅनिटीज आणि विज्ञान शाखेच्या ३२ विभागातील अभ्यासक्रमांचे प्रवेश केंद्रीय प्रवेश पद्धतीद्बारे करण्याचा निर्णय घेतला. १६ जूनपासून विद्यापीठ परिसरातील ग्रामगीता भवन येथे केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची अगदी झुंबड उडाली असून अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी रेलचेल दिसून येत आहे. विज्ञान आणि ह्युमॅनिटी विभागांतर्गत येणाऱ्या विषयांसाठीच केंद्रीय प्रवेश पद्धती असून एलएमएम, एमकॉम, होमसायन्स, एमएफए आणि मास कम्युनिकेशन या विषयासाठी त्या-त्या विभागात अर्जविक्री करण्यात येत आहे. 

विद्यार्थ्यांना २७ जूनपर्यंत अर्जाची खरेदी आणि सादर करता येणार आहे. ४ ते ६ जुलैपासून होणाऱ्या प्रवेश फेरी सुरू होईल. यावर्षी प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद बघता, पुढल्या वर्षीपासून ऑनलाइन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया राबविल्या जाणार आहेत. 

सुटीच्या दिवशीही अर्जविक्री, स्वीकारणे सुरू  
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या विविध पदव्युत्तर शैक्षणिक विभागांतील प्रवेशाची प्रक्रिया उद्या २५ जून (रविवार) व परवा २६ जून (रमजान ईद) या सुट्यांच्या दिवशीही सुरूच राहणार आहे. उपरोक्त दोन्ही दिवशी विद्यापीठाच्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेचे अर्ज विद्यापीठ परिसरातील ग्रामगीता भवनात प्राप्त होतील व स्वीकारलेही जातील. संबंधित विद्यार्थ्यांनी तसेच पालकांनी याची नोंद घ्यावी व सुटी कालावधीतही सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाने केले आहे.

Web Title: nagpur vidarbha news 2600 form sailing