कॅन्सरग्रस्तांसाठी अवघे ३० तज्ज्ञ

कॅन्सरग्रस्तांसाठी अवघे ३० तज्ज्ञ

मध्य भारतातील वास्तव - मुखाच्या कॅन्सरमध्ये वाढ

नागपूर - मुखाच्या कॅन्सरमध्ये अहमदाबाद अव्वल होते. परंतु, नागपूरने अहमदाबादला मागे टाकले. हेड ॲण्ड नेक कॅन्सरमध्ये नागपूर पहिल्या स्थानावर आले. नागपुरात तोंडाचा आणि स्तनाच्या कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. तीस लाख लोकसंख्या असलेल्या शहरात दुर्दैवाने उपचार करणाऱ्या कॅन्सरतज्ज्ञांची संख्या अवघी ३० आहे. तर तीस कॅन्सरतज्ज्ञ मध्य भारतातील रुग्णांवर उपचार करीत असल्याची माहिती कॅन्सररोगतज्ज्ञ डॉ. कृष्णा कांबळे यांनी दिली. 

मध्य प्रदेश, छत्तीसगड, आंध्र प्रदेश, तेलंगणा राज्यातील कॅन्सरग्रस्त उपराचाराठी नागपुरात  येतात. त्यामुळेच नागपूरच्या कॅन्सर रजिस्ट्रीत वाढ होत आहे. हेड ॲण्ड नेक कॅन्सरग्रस्तांचे ८० टक्के रुग्णांचे निदान तिसऱ्या स्टेजमध्ये होते. यामुळे मृत्यूदरही वाढला असल्याचे कॅन्सररोगतज्ज्ञ डॉ. कांबळे म्हणाले. प्रगत तंत्रामुळे क्षतिग्रस्त भागावरच रेडिएशन थेरेपी करता येते. शिवाय  त्याचा अन्य पेशींवरही प्रभाव पडत नाही. किमोथेरपीतील असह्य वेदनेचे प्रमाणही कमी झाले असून रुग्ण पूर्णपणे बरा होत नसला तरी कॅन्सरच्या पेशींवर नियंत्रण मिळविता येत  असल्याचा दावा डॉ. कांबळे यांनी केला.

कॅन्सरचे रुग्ण
मेडिकल     राष्ट्रसंत तुकडोजी कॅन्सर हॉस्पिटल

पुरुष -४५६        पुरुष - ६१५
महिला - १९९        महिला - २२४

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com