स्वाइन फ्लू मृत्यूचा आकडा ३४ वर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

नागपूर - तापमानातील बदलाने शहराभोवती स्वाइन फ्लूचा विळखा अधिक घट्ट होत आहे. जानेवारीपासून चालू वर्षात या आजाराने नागपूर विभागात आतापर्यंत ३४ जण दगावले. सर्वाधिक २१ मृत्यू हे एकट्या नागपूर शहर आणि ग्रामीण भागात झालेत. तरीदेखील महापालिकेचा आरोग्य विभाग सुस्त आहे. 

दगावलेली चाळिशीतील महिला जुना बाबूळखेडा परिसरातील विक्रम नगरातील आहे. रामदासपेठ येथील क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. १३ रुग्ण मध्य प्रदेशातून नागपुरात रेफर करण्यात आले होते. विभागात स्वाइन फ्लूची लक्षणे आढळल्याने आतापर्यंत सातशेवर संशयितांपैकी १२१ जणांना स्वाइन फ्लूने विळख्यात घेतले होते. 

चंद्रपूर, भंडाऱ्यातही मृत्यू
स्वाइन फ्लूच्या प्रकोपाने चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातही प्रत्येकी एक मृत्यूची नोंद आरोग्य विभाग उपसंचालक कार्यालयाने घेतली आहे. एकट्या जुनच्या पंधरा दिवसांत ४ स्वाइन फ्लूबाधितांचा मृत्यू उपराजधानीच्या शहरात झाला आहे.

Web Title: nagpur vidarbha news 34 people death by swine flu