चार नागपूरकर घेणार न्यायमूर्तिपदाची शपथ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 जून 2017

नागपूर - मुंबई उच्च न्यायालयात नवीन अतिरिक्त न्यायाधीशांची नियुक्ती करण्याचे  आदेश केंद्रीय विधी व न्याय विभागाने दिले आहे. यानुसार राज्याचे महाअधिवक्ता रोहित देव, ॲड. भारती डांगरे, ॲड. मनीष पितळे व ॲड. पृथ्वीराज चव्हाण हे नागपूरकर सोमवारी (ता. ५) मुंबईत न्यायमूर्तिपदाची शपथ घेणार आहेत.

याबाबतची अधिकृत अधिसूचना तसेच शपथविधी सोहळ्याचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच  जाहीर झाले आहे. सर्वोच्च न्यायालयाने ४८ नव्या नियुक्तींचे प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केले होते. त्यात मुंबई उच्च न्यायालयातील अतिरिक्त न्यायाधीशांच्या नावांचीही शिफारस होती.

सर्वोच्च न्यायालयाने प्रस्तावित केलेल्या नावांवर केंद्र सरकारनेही शिक्कामोर्तब केले असून, त्यात देव, डांगरे, पितळे आणि चव्हाण यांचा समावेश होता. त्यानुसार या चौघांनाही प्रॅक्‍टिस थांबविण्याबाबत अधिकृत आदेश दिले.

महाधिवक्ता रोहित देव व भारती डांगरे यांनी नागपूर विद्यापीठातून विधी पदवी संपादित केलेली आहे. दोघांनीही नागपूर उच्च न्यायालयात प्रॅक्‍टिस सुरू केली. ॲड. डांगरे यांनी सहायक सरकारी वकील, नंतर अतिरिक्त सरकारी वकील आणि आता सरकारी वकील म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. पितळे यांनी श्रीहरी अणे यांच्याकडे वकिली सुरू केली. त्यानंतर ते दिल्लीला गेले असता ॲड. संघी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रॅक्‍टिस केली.

कालांतराने ते स्वतंत्ररीत्या वकिली करू लागले. पृथ्वीराज चव्हाण हे न्यायमूर्ती वाहाने यांचे ज्युनिअर होते. त्यांनी १९९२ मध्ये वकिलीला सुरुवात केली. ते २००२ मध्ये जिल्हा न्यायाधीश बनले. त्यांनी आतापर्यंत मोक्का, पोटा एनआयए आदी प्रकरणे हाताळली आहेत. किरकोळ दिवाणी न्यायालयात मुख्य न्यायाधीश म्हणूनही त्यांनी कामकाज सांभाळले आहे. अरुण गवळीला शिक्षा सुनावणारे न्यायाधीश म्हणून त्यांची ओळख आहे.

नवीन सत्र, नवे न्यायमूर्ती
१४ पैकी ८ न्यायमूर्तींची विविध जिल्ह्यांतील प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीशांमधून, तर ६ न्यायमूर्तींची वकिलांमधून नियुक्ती केली. त्यांच्या शपथविधीची तारीख जाहीर झालेली नाही. उच्च न्यायालयाच्या उन्हाळ्याच्या सुट्या ४ जून रोजी संपत असून, ५ जूनपासून नियमित कामकाज  सुरू होईल. नवीन सत्र सुरू होत नाही तोच शपथविधीनंतर नवीन न्यायमूर्तींना मुंबई, औरंगाबाद  व नागपूर यापैकी एका ठिकाणी नियुक्ती दिली जाईल.

Web Title: nagpur vidarbha news 4 people judge oath