२० रुपयांच्या खर्ऱ्यासाठी ५० रुपये दंड

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

रस्त्यांवर थुंकणे पडणार महाग - मनपाचे उपद्रव शोधपथक 

नागपूर - रस्त्यांवर थुंकणे, कचरा टाकणे, अवैध होर्डिंग लावणे तसेच मलबा टाकणे आता चांगलेच महागात पडू शकते. महापालिकेने यावर प्रतिबंध लावण्यासाठी उपद्रव शोधपथके स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पथकात माजी सैनिकांची नियुक्ती करण्यात येईल. प्रत्येक प्रभागात दोन पथके याप्रमाणे ७६ रक्षक नेमले जातील. यामुळे २० रुपयांचा खर्रा खाऊन रस्त्यावर थुंकल्यास ५० रुपयांचा दंड मोजावा लागू शकतो. 

नागपूर खर्रा शौकिनांचे शहर आहे

खर्रा खाऊन रस्त्यावर पिचकारी मारणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पिचकारी मारताना आपणच शहर गलिच्छ करतो याचाही विचार केला जात नाही. कोणी टोकले तर शहरच आपल्या मालकीचे आहे, असा आविर्भाव त्याचा असतो. दुसरीकडे मंगल कार्यालये, सभागृहांचे जाळेच शहरभर आहे. कार्यक्रमासाठी लाखो रुपये घेतले जातात. मात्र, कार्यक्रमानंतर उरलेले अन्न व कचरा रस्त्यावर टाकून मोकळे होतात. ठेलेवाले, छोटेमोठे हॉटलेवाले यांच्यासाठी रस्ता म्हणजे स्वतःचा कचरा फेकण्याचे हक्काचे ठिकाणच वाटते. यामुळे महापालिकेच्या यंत्रणेमार्फत साफसफाई केल्यानंतरही शहर गलिच्छ दिसते. जनजागृती करून कुणी ऐकत नसल्याने आता कचरा करणाऱ्यांवर दंड ठोठावण्याचा निर्णय  घेण्यात आला असल्याचे स्थायी समितीचे अध्यक्ष संदीप जाधव यांनी सांगितले. उपद्रव शोध पथकांच्या नियुक्तीसाठी सुमारे दोन कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. यास स्थायी समितीने  मान्यता दिली.

असा आकारला जाईल दंड
 सार्वजनिक ठिकाणी थुंकणे        ५० रुपये
 सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे   १०० रुपये 
 फेरीवाल्यांनी कचरा केल्यास       २०० रुपये 
 दुकानदारांनी कचरा केल्यास       २०० रुपये 
 इस्पितळांनी कचरा टाकल्यास       ५०० रुपये 
 मॉल, हॉटेलने टाकल्यास       १००० रुपये

Web Title: nagpur vidarbha news 50 rupees fine for 20 rupees tobacco