दोघांनी भूखंड हडपला, एकास अटक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

नागपूर - गुन्हे शाखेच्या एसआयटीकडे तक्रारींचा ओघ पुन्हा वाढला असून, पीडितांना न्याय देण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत आहेत. आतापर्यंत एसआयटीने कोट्यवधींचे भूखंड आणि जमिनी मूळ मालकांना परत दिल्यात. शनिवारी आणखी दोघांवर भूखंड हडपल्याचे गुन्हे एसआयटीने दाखल करून एकाला अटक केली; तर दुसऱ्याने बनावट कागदपत्रे पोलिसांच्या स्वाधीन करून शरणागती पत्करण्याची तयारी दर्शविली आहे.

सहायक पोलिस आयुक्‍त सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्वातील एसआयटीमध्ये आतापर्यंत दोन हजारांवर तक्रारी दाखल झाल्यात. मोहम्मद सलीम अब्दुल रहीम (वय ३९, रा. स्मृतीनगर) यांनी २००६ मध्ये केजीएन सोसायटी बोरगाव येथून शंभर देवराज पुलैया यांच्याकडून भूखंड विकत घेतला होता. आरोपी शेषनाथसिंग जागेश्‍वरसिंग ठाकूर आणि त्याचा चुलतभाऊ अनिलकुमार श्‍यामस्वरूप शुक्‍ला या दोघांनी संगनमत करून तो भूखंड हडपला. बनावट कागदपत्रे तयार करून भूखंडावर कब्जा केला. या प्रकरणी गिट्टीखदान पोलिस ठाण्याच्या तत्कालीन पोलिस निरीक्षकांकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र, ठाकूर बंधूंकडून मलई लाटल्यामुळे मो. सलीम यांना आल्यापावलीच परत जावे लागले.

 पोलिसांच्या सहकार्याने तो भूखंड ठाकूर भावंडांनी लाटला होता. मात्र, एसीपी वाघचौरे यांनी सखोल तपास करून भूखंडाचा ताबा मो. सलीम यांना दिला. बनावट कागदपत्रे तयार करून भूखंड हडपण्याच्या गुन्ह्यात शेषनाथसिंग ठाकूरला अटक केली. अनिलकुमार ठाकूर पळून गेला. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक जितेंद्र बोबडे करीत आहेत.

Web Title: nagpur vidarbha news