अडचणींमुळे शिक्षक बेजार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नागपूर - ‘सरल’ प्रणालीमध्ये विद्यार्थ्यांची माहिती भरताना आधीच ‘आधार कार्ड’ची सक्ती केल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच आता भारनियमनाची भर पडल्याने प्रामुख्याने ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिक्षक त्रस्त आहेत. एकीकडे माहिती भरण्यात येणाऱ्या अडचणी आणि दुसरीकडे कमी विद्यार्थी संख्या दिसल्यास अतिरिक्त ठरण्याची भीती अशी टांगती तलवार शिक्षकांवर आहे. 

राज्यातील शाळांमधील विद्यार्थ्यांची सर्व माहिती ‘सरल’ संगणक प्रणालीच्या माध्यमातील  संकलित केली जात आहे. त्याआधारे शिक्षकांची संचमान्यताही केली जाणार आहे. त्यामुळे  सध्या सर्व शाळांमधील शिक्षक ही माहिती भरण्यात व्यस्त आहेत. यावर्षी आधार कार्डची माहिती भरण्याचे बंधन घालण्यात आले आहे. सुरुवातीला ही माहिती भरण्यासाठी सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र, सातत्याने येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे ही मुदत  ऑक्‍टोबरपर्यंत वाढविण्यात आली होती. पण, अडथळे दूर न झाल्याने सर्व शाळांची माहिती  भरून झाली नाही. परिणामी पुन्हा एकदा ऑक्‍टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. तरीही ‘सरल’चे संकेतस्थळ सातत्याने ‘हॅंग’ होत आहे तसेच इतर अडचणी येत आहेत. त्यातच आता भारनियमनाची भर पडल्याने या मुदतीतही काम पूर्ण होणार नाही, अशी भीती शिक्षकांकडून व्यक्त केली जात आहे.

भारनियमनाचा फटका
शिक्षण विभागाने ‘आधार’मधील माहिती ‘सरल’मध्ये भरणे बंधनकारक केले आहे. मात्र, अनेक विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळेतील नोंदवही व आधारवरील माहितीमध्ये तफावत आढळून येत आहे. परिणामी माहिती भरण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. काही दिवसांपासून भारनियमन  वाढविल्याने त्याचाही फटका बसत आहे.

Web Title: nagpur vidarbha news