एमटीपी किटअभावी थांबला मनोरुग्ण महिलेचा गर्भपात

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 नोव्हेंबर 2017

नागपूर - प्रादेशिक मनोरुग्णालयातून रेफर केलेल्या डेंगीसदृश रुग्णावरील उपचारासाठी मेडिकलमधील डॉक्‍टरांनी प्रिस्क्रिप्शन दिल्याचे प्रकरण ताजे असताना पुन्हा त्यात एका प्रकरणाची भर पडली आहे. मनोरुग्णालयातून गर्भपातासाठी पाठविण्यात आलेल्या एका मनोरुग्ण महिलेसाठी प्रिस्क्रिप्शनवर ‘एमटीपी किट’ लिहून दिले. मेडिकलतर्फे साधे एमटीपी किट उपलब्ध करून देण्यास नकार दिल्यामुळे मनोरुग्ण महिला वॉर्ड क्रमांक ३० मध्ये खाटेवर जैसे थे अशा स्थितीत असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.

रस्त्यावर आढळून आलेली अनोळखी मनोरुग्णालयात भरती आहे. मनोरुग्णालयाने अंजली असे नाव दिले आहे. ही अंजली पाच महिन्यांची गर्भवती असल्याचे आढळून आल्यानंतर मेडिकलमध्ये गर्भपातासाठी पाच दिवसांपूर्वी पाठवले. स्वतःची ओळख हरवून बसलेल्या मनोरुग्ण महिलांची भरती होतानाच गर्भवती आहे किंवा नाही, अशी चाचणी केली जाते. परंतु ही पाच महिन्यांनंतर गर्भवती असल्याचे उघड झाले. ती मनोरुग्ण असल्यामुळे सांभाळ करण्यास सक्षम नसल्यानेच कायद्याने गर्भपात करण्यास परवानगी दिली आहे. नियमानुसार  प्रादेशिक मनोरुग्णालय प्रशासनाने गर्भपातासाठी तिला अधिकृत मेडिकलमध्ये रेफर केले. मेडिकलच्या वॉर्ड क्रमांक तीसमध्ये तिला गर्भपातासाठी दाखल करण्यात आले आहे. मेडिकलमध्ये आणल्यानंतर डॉक्‍टरने गर्भपातासाठी एमटीपी किट लिहून दिली. महिलेसोबत पाठविण्यात आलेल्या परिचारिकेने हे प्रिस्क्रिप्शन वैद्यकीय अधीक्षकांना सादर केले. डॉक्‍टरांच्या अधिकृत प्रिस्क्रिप्शनशिवाय ही किट उपलब्ध होऊ शकत नाही.

एमटीपी किट बरोबर नाही  
डागा प्रशासनाकडे विनंती करून एमटीपी किट मागवून घेतली. पाच गोळ्यांच्या डोसचा समावेश असलेली ही किट गर्भपातासाठी डॉक्‍टरांच्या देखरेखीखाली रुग्णाला दिली जावी, असा नियम आहे. मनोरुग्णालय प्रशासनाने डागा कडून उपलब्ध केलेली किट चालत नसल्याचे मेडिकलच्या डॉक्‍टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे उपचाराविना या मनोरुग्ण महिलेची फरपट सुरू आहे. या संदर्भात प्रादेशिक मनोरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मेडिकलमधील डॉक्‍टर उपचार करण्यात टाळाटाळ करीत असल्याची हतबलताही त्यांनी व्यक्त केली.

Web Title: nagpur vidarbha news abortion stop by mtp kit