काँग्रेसने केले अमित शहांच्या पुतळ्याचे दहन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

नागपूर - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांचा मुलाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी चिटणीस पार्क चौकात अमित शहा यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

अमित शहाचा मुलगा जय शहा यांची कंपनी तोट्यात होती. नोटाबंदीच्या काळात एकाच वर्षात या कंपनीने सोळा हजारपट नफा कमविला आहे.

नागपूर - भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षांचा मुलाच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी चिटणीस पार्क चौकात अमित शहा यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. 

अमित शहाचा मुलगा जय शहा यांची कंपनी तोट्यात होती. नोटाबंदीच्या काळात एकाच वर्षात या कंपनीने सोळा हजारपट नफा कमविला आहे.

भ्रष्टाचाराशिवाय हे शक्‍यच नाही. भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी स्वतःच्या मुलासाठी केलेला भ्रष्टाचाराचा निषेध म्हणून अमित शहा यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले. यानंतर झालेल्या बैठकीत शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी रामदेवबाबा  यांच्या संपत्तीतदेखील भाजपच्या कार्यकाळात भरमसाट वाढ झाली असल्याचे सांगितले.  सिलिंडर, पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढवून सर्व सामान्यांना लुटायचे आणि उद्योगपतींची घरे भरायची असे भाजपचे धोरण आहे.

याविरोधात प्रत्येक वस्त्यांमध्ये एकाच दिवशी आंदोलने  केली जातील. महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांनी दहा ते बारा हजार मते घेतली. त्यांनी घरोघरी जाऊन भाजपचा भ्रष्टाचार नागरिकांच्या निदर्शनास आणून द्यावा असे निर्देशही विकास ठाकरे यांनी दिले. 

राहुल गांधींना अध्यक्ष करा
शहर काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी यांना राष्ट्रीय अध्यक्ष करावे असा ठराव करण्यात आला. विकास ठाकरे यांनी ठराव मांडला. प्रदेश सचिव ॲड. सूचक अभिजित वंजारी असलेल्या  ठरावास शहर उपाध्यक्ष दिनेश बानाबाकोडे अनुमोदन दिले. त्यांना सर्वानुमते त्यास मंजुरी देण्यात आली. 

वनवेंना टोला
विरोधी पक्षाची भूमिका कठोर असावी लागते. त्याशिवाय सत्ताधारी ऐकत नाही. जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल तर सभागृह आणि सभागृहाच्या बाहेरदेखील विरोधीपक्ष नेत्यात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलण्याची हिंमत असावी लागते असे सांगून कोणाचेही नाव न घेता विकास ठाकरे यांनी तानाजी वनवे यांना टोला हाणला.

Web Title: nagpur vidarbha news amit shaha statue fire